गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. यावरून झालेला राजकीय वाद आणि त्यासह स्थानिकांचा विरोध, जमीन अधिग्रहणातील आव्हानं अशा सर्व बाबींची त्या त्या वेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा पाहायला मिळाली. अखेर या मार्गाचा शिर्डीपर्यंतचा टप्पा आता सुरू झाला असून त्यापुढचा मुंबईपर्यंतचा टप्पा येत्या वर्षभरात कार्यरत होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या रस्त्याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’च्या जिल्हा निर्देशांक सोहळ्यात बोलताना आपला अनुभव उपस्थितांना सांगितला.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कामगिरीचं मोजमाप करणाऱ्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांसमोर आपलं मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीसांनी पायाभूत सुविधांचं महत्त्व पटवून देताना समृद्धी महामार्गाचं राज्याच्या विकासातलं आणि असमोतल दूर करण्यामधलं महत्त्वाचं स्थान विषद केलं.

Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…
lok sabha election 2024 bjp condition before cm eknath shinde for kalyan and thane lok sabha seat
ठाणे-कल्याण यापैकी एक जागा हवी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपची अट; सूत्रांची माहिती
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा
Controversies in the Grand Alliance about constituencies like South Mumbai, North West Mumbai, Satara Amravati  Sambhajinagar Nashik  Shirdi Ratnagiri Sindhudurg
तिसऱ्यांदा दिल्लीवारी; शिंदे, अजित पवार शहांच्या भेटीस, महायुतीत पेच कायम

असमतोल कमी करण्यासाठी काय करावं?

यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये असणारा विकासात्मक असमतोल दूर करण्यासाठी काय करावं? यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली. “असमतोल कमी करण्यासाठी काय करावं? गडचिरोलीमध्ये खाणकाम सुरू केलं तर तिथे ३५-४० हजार कोटींची गुंतवणूक होऊ शकते. अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याच्या बलस्थानांनुसार त्या त्या जिल्ह्यासाठी धोरण तयार करण्याचं नियोजन आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसत्ताचा उत्तम उपक्रम म्हणजे हा जिल्हा निर्देशांक – देवेंद्र फडणवीस

“आज पैसा कसाही उभा करता येऊ शकतो. त्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण त्यासाठी योग्य नियोजन आणि प्रस्ताव असण्याची गरज आहे. त्याच्या मान्यता, जमीन अधिग्रहण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियोजन केल्या, तर त्या आरामात होऊ शकतात”, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील ‘तो’ अनुभव

यावेळी बोलताना फडणवीसांनी समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या कामासंदर्भात बोलताना अनुभव व्यक्त केला आहे. “नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग करण्याचं ठरवलं, तेव्हा लोक वेड्यात काढायचे की तुम्ही ५० हजार कोटींचा रस्ता बनवणार आहात का? हे शक्य तरी आहे का? जमीन अधिग्रहण शक्य आहे का? पण तो झाला. एक प्रकल्प किती बदल घडवू शकतो, याचं उदाहरण नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे आहे. हा रस्ता आता राज्यात असमतोलामुळे मागास राहिलेल्या ७ ते ८ जिल्ह्यांचं अर्थकारण बदलणार आहे. हा एक रस्ता त्या जिल्ह्यांमधला हा असमतोल दूर करून त्यांना राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या बरोबरीत आणणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्यातल्या ६ जिल्ह्यांचा कायापाटल करेल. यात आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर साध्य करता येईल”, असंदेखील फडणवीस यांनी नमूद केलं.