राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला नवा आयाम देण्यासाठी ओरॅकल या कंपनीसोबत महाराष्ट्राचा सामंजस्य करार होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी रात्री अमेरिकेला रवाना झाले.

‘ओरॅकल’च्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून ही कंपनी प्रथमच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार करीत आहे. ओरॅकलतर्फे आयोजित ओपन वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रमुख भाषण होणार आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रथमच असा सन्मान मिळत आहे. ओरॅकलकडून राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला साहाय्यभूत ठरण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री  कॅलिफोíनयाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांचीही भेट घेतील. तसेच अमेरिकेतील विविध प्रमुख कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार असून ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या मोहिमेंतर्गत राज्यात उद्योग सुलभतेसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत ते प्रमुख  उद्योगांच्या पदाधिकाऱ्यांना अवगत करणार आहेत.

  • राज्यात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महत्त्वपूर्ण मदत होणार आहे.
  • भविष्यातील गरजांचा विचार करून त्यानुरूप सुविधा, यंत्रणा उभी करण्यात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
  • कंपनीचे कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवड अशा तीन महापालिकांना सहकार्य लाभणार आहे.
  • राज्यातील ही तीन महत्त्वाची शहरे स्मार्ट सिटी होण्याकडे महत्त्वाचे पाऊल टाकणार आहेत.