मुंबई : धारावी विधानसभा मतदारसंघ हा यावेळच्या निवडणुकीत चर्चेतला मतदारसंघ आहे. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी चांगलाच गाजला व त्याचा महायुतीला चांगलाच फटकाही बसला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांना या मतदारसंघात तब्बल ३५ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण डॉ. ज्योती गायकवाड या निवडणूक लढवत आहेत. वर्षा गायकवाड या मतदारसंघाच्या आमदार होत्या. आता त्या खासदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला या मतदारसंघातून तिकीट दिल्यामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे. त्यामुळे लोकसभेला मिळालेले मताधिक्य विधानसभेला गायकवाड कुटुंबाला राखता येईल का याबाबत उत्सुकता आहे. एवढे मताधिक्य मिळवणे अन्य कोणत्याही उमेदवाराला शक्य नसल्याचेही जाणकार सांगतात. मात्र धारावी बचाव आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी येथील गल्लीबोळातील घरोघरी जाऊन धारावी बचावचा मुद्दा पटवून दिला आहे. तसेच गायकवाड कुटुंबाने गेल्या ४० वर्षांत कोणताही विकास केला नसल्याचा मुद्दाही प्रचारात आहे.

धारावी प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध करणारे धारावी बचाव आंदोलनाचे अॅड. संदीप कटके म्हणाले की, धारावीच्या पुनर्विकासाला आमचा विरोध नाही, पण पात्र – अपात्रचा मुद्दा करून धारावीवासियांना बाहेर काढण्याचा डाव आहे, त्याला आमचा विरोध आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>>रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज

धारावी मतदारसंघ गेली ४० वर्षे गायकवाड कुटुंबाकडे आहे, पण या मतदारसंघात शौचालयांची कमतरता आहे, शाळा नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे व त्याचा फायदा आम्हाला होईल, असा विश्वास कटके यांनी व्यक्त केला. डॉ. ज्योती गायकवाड या धारावीच्या रहिवासी नाहीत. त्याचे नाव आणि पत्ता काही महिन्यांपूर्वी बदलला आहे. त्यामुळे ही धारावीची बेटी अवघी चार महिन्यांची आहे असाही टोला त्यांनी लगावला आहे.

कॉंग्रेसमधील अंतर्गत नाराजी, धारावीवासियांमधील नाराजी याचा फायदा संघटनेला होईल, असा विश्वास धारावी बचावला वाटतो आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पारंपरिक मतदार कॉंग्रेसच्या उमेदवाराला मत देणार नाहीत, ती मतेही आपल्याकडे वळतील, असा विश्वास त्यांना आहे.

हेही वाचा >>>राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले

पुनर्विकासाचा मुद्दा गाजणार

धारावी म्हणजे गायकवाड कुटुंब हे राजकीय समीकरण मोडून काढण्यासाठी यंदा धारावीमध्ये धारावी बचाव चळवळीतील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. धारावीच्या संपूर्ण परिसराचा समावेश असलेल्या या मतदारसंघात यंदा धारावी पुनर्विकासाचा मुद्दा गाजणार आहे. याच मुद्द्यावर काम करणाऱ्या धारावी बचाव मंचचे अॅड. संदीप कटके निवडणूक लढवत आहेत. धारावीतील रहिवासी आपल्या पाठीशी असून चाळीस वर्षांच्या परिवारवादाच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष असल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला होईल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Story img Loader