मुंबई: चहा पाकिटांमध्ये दीड कोटी रुपयांचे हिरे लपवून आणणाऱ्या व्यक्तीला बुधवारी विमानतळावर पकडण्यात आले. सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.मुक्कीम रझा अश्रफ मन्सुरी असे अटक आरोपीचे नाव असून तो दक्षिण मुंबईतील रहिवासी आहे. तो दुबईहून मुंबई आला होता.
त्याने चहाच्या पाकिटामध्ये ३४ हिरे आणले होते. ते हिरे १५५९.६८ कॅरेटचे असून त्यांची किंमत एक कोटी ४९ लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. त्याला हिऱ्यांच्या तस्करीसाठी पैसे देण्यात येणार होते; पण त्यापूर्वीच त्याला अटक झाली.

चंद्रकांतदादांचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीकडे! आढावा बैठक घेत दिल्या सूचना

बापरे! विमानतळावर महिलेने चक्क तोंडात कोंबल्या नोटा; पाणी पित गिळले पैसे, Video Viral

विमानात प्रवासी बसले, पण वैमानिकाचा पत्ता नाही; काय घडले नेमके?

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चार नवीन पोलीस ठाणी