महात्मा गांधी यांची सत्य आणि अहिंसा ही दोन तत्त्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाळतात का? या तत्त्वांप्रमाणे तुम्ही वागत नाही तोपर्यंत तुम्हाला महात्म गांधीजींच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्लॉगला उत्तर दिले आहे.
महात्मा गांधीजी हे सत्य व अहिंसेचे पुजारी होते. ज्या महात्मा गांधींना पुढे करून मोदी राजकीय खेळी खेळत आहेत. त्यांनी संपूर्ण जनतेला आधी सांगावे ते महात्मा गांधीजींची सत्य आणि अहिंसा ही दोन तत्वे पाळतात का ?
#NarendraModi #NCP @NCPspeaks @PTI_News @ANI https://t.co/9SUK791rfY— Nawab Malik (@nawabmalikncp) March 12, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दांडी यात्रेच्या स्मरण दिनानिमित्त महात्मा गांधीजींवर ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगला उत्तर देताना नवाब मलिक यांनी महात्मा गांधीजींची सत्य आणि अहिंसा ही दोन तत्वे मोदी पाळतात का ? असा सवालही केला. महात्मा गांधी यांच्यावर ब्लॉग लिहिताना मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आमचा एकच प्रश्न मोदींना आहे की, महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करता परंतु त्यांच्या विचाराचे पालन किती करता आहात असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला.