मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जातीत (एसटी) समावेश करण्यात अडचणी येत असल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला. तसेच धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याबाबत सरकारने असमर्थता दर्शवली. धनगड म्हणजेच धनगर असल्याचे जाहीर करावे. तसेच धनगर समाजाला भटक्या जमातीचे (एनटी) आरक्षण न देता त्यांचा समावेश अनुसूचित जातीत (एसटी) करावा या मागणीसाठी महाराष्ट्र अहिल्याबाई समाज प्रबोधिनी मंच, भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. तर वनवासी कल्याण आश्रमने वकील गार्गी वारूंजीकर यांच्यावतीने या याचिकांना विरोध करणारी याचिकाही करण्यात आली आहे.

न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एन. लद्धा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर  एकत्रित सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडताना धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यास राज्य सरकार असमर्थ असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या समाजाचा अनुसूचित जातीत समावेश अडचणी येत असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी निकाल देताना परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे म्हटले होते. या निकालाचा दाखला देऊन सरकारने या प्रकरणातील आपली असमर्थता व्यक्त केली.

supreme-court_
मदरसा कायदा रद्द करण्यास अंतरिम स्थगिती; अलाहाबाद उच्च न्यायालयाने चुकीचा अर्थ लावला- सर्वोच्च न्यायालय
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Chief Minister eknath shinde order on BJPs letterhead ruled illegal by High Court
भाजपच्या ‘लेटरहेड’वर मुख्यमंत्र्याचे आदेश, उच्च न्यायालय म्हणाले, बेकायदेशीर…
High Court, Expresses Anger, maharashtra Government, Delay, Taking Possession, New High Court Building, Site in Bandra,
जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारची कानउघाडणी