शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीत नेहमीच कुरबुरीच्या चर्चा होत असतात. आज दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कामावर नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत या चर्चांमध्ये कोणतीही सत्यता नसल्याचं सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर आता स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आधीच खुलासा केला आहे. अशाप्रकारची कुठलीही नाराजी नाही. नाराजी असण्याचा प्रश्न नाही. आम्ही परस्परांना विश्वासात घेऊनच सगळे निर्णय घेत असतो.”

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

“संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. त्याबाबत आमच्या विभागाकडून काही कमतरता होत असतील जरूर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू,” असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : गृहमंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा बातम्या…”

दरम्यान याआधी अस्लम शेख असो किंवा वर्षा गायकवाड या काँग्रेस नेत्यावर देखील गुन्हे दाखल झाले होते. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांकडून गृह खात्यावर नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना दिलीप वळसे म्हणाले, “या प्रकरणात काँग्रेस नेत्यांची नाराजी बाहेर आलीय, परंतु त्या संदर्भात मंत्रिमंडळात मुख्य सचिवांना एक अहवाल देण्यास सांगण्यात आलं. तो अहवाल आल्यानंतरच या विषयावर बोलणं उचित होईल.”