कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली असून, ज्यामध्ये तुम्ही जिल्ह्यात येऊ नये असे सोमय्यांना सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांना गणेश निसर्जणासाठी परवाणगी देण्यात आली होती. त्यानंतर सोमय्या कोल्हापूर जाण्यावर ठाम आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या यांना पोलीस ताब्यात देखील घेऊ शकतात.

किरीट सोमय्या म्हणाले, “पोलिसांनी मला चार तास मला माझ्या कार्यालयात डांबून ठेवलं. मला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस द्वारे जिल्ह्यात प्रवेश बंदी केली आहे. पण मला मुंबईत देखील अडवण्यात येत आहे. मात्र मी उद्धव ठाकरे यांच्या अलिबाबा आणि चाळीस चोर मंत्रिमंडळाला जेलमध्ये टाकणार”

किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही नोटीस दिली आहे. नोटीसमध्ये सर्व पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने सोमय्या यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला दर्शवली असमर्थता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून होणारा विरोध पाहता उद्याचा दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची विनंती केली आहे. यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुंड आहेत का असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. शदर पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, दिलीप वळसे-पाटील असतील यांनी मला थांबवून दाखवावं, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

“माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल. महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भाजपा घाबरणार नाही. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आहे.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.