मुंबई : नरिमन पॉइंट येथून थेट मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अवघ्या तासाभरात पोहचणे शक्य व्हावे यासाठी चिर्ले येथून- मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गादरम्यान ७.३५ किमी लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गाच्या बांधकामासाठी बुधवारी निविदा जारी केली.

मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर कमी करण्यासाठी मुंबई पारबंदर प्रकल्पाचे (शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू) काम हाती घेण्यात आले आहे. या सेतूमुळे मुंबई – चिर्ले दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. मात्र चिर्ले येथून पुढे पुण्याला राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागणार असून हे अंतर अधिक आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग थेट सागरी सेतूने जोडण्यात येणार आहे. त्यासाठी चिर्ले ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गदरम्यान ७.३५ किमी लांबीचा मार्ग बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. हा मार्ग सहापदरी असेल. यासाठी १ हजार ३५१ कोटी ७३ लाख रुपये खर्चाच्या या मार्गाचा सविस्तर आराखडा ‘टेक्नोजेन कन्सल्टंट’ कंपनीने तयार केला आहे. आराखडय़ाला मंजुरी मिळाल्यानंतर एमएमआरडीएने मार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
heavy vehicles ban on Mumbai Pune Expressway for three days
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
Pune Division , Central Railway, miraj, mega Block , 29 march 2024, Trains Cancelled, Rescheduled,
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द