मुंबई : मुंबईमध्ये जून व जुलैच्या तुलनेमध्ये १४ ऑगस्टपर्यंत साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत जूनमध्ये १३९५ रुग्ण, जुलैमध्ये ३०४४ इतके रुग्ण सापडले होते. मात्र ऑगस्टमध्ये रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ झाली असून, आतापर्यंत २ हजार ९८ इतके रुग्ण सापडले आहेत. यामध्ये हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच जून व जुलैमध्ये वेगाने वाढणाऱ्या गॅस्ट्रो आणि कावीळच्या रुग्णांच्या संख्येत ऑगस्टमध्ये घट झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून हिवताप, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळ आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. जूनमध्ये पावसाळा सुरू होताच हिवताप, डेंग्यू, गॅस्ट्रो व कावीळच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जुलैमध्ये लेप्टो आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांची भर पडली. पायाला जखम झालेली असताना साचलेल्या पावसाच्या पाण्यातून ये-जा केल्यास लेप्टोची लागण होत असून जुलैपासून लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली. मात्र ऑगस्टमध्ये गॅस्ट्रो आणि कावीळच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली, तर हिवताप, डेंग्यू आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १४ ऑगस्टपर्यंत मुंबईमध्ये हिवतापाचे ५५५ रुग्ण, डेंग्यूचे ५६२ आणि लेप्टोचे १७२ रुग्ण सापडले आहेत. हेही वाचा - ‘मेट्रो ३’ स्थानक परिसरात २९३१ वृक्ष लागवडीसाठी तीन कंत्राटे; प्रती झाड ४१ हजार रुपये खर्च – एकूण खर्च १२ कोटी रुपयांवर लेप्टोच्या प्रतिबंधासाठी १९ हजार उंदीर मारले साचलेल्या पाण्यामध्ये उंदराने मलमूत्र विसर्जन केल्याने आणि ते पाणी जखमेच्या माध्यमातून मनुष्याच्या संपर्कात आल्यास लेप्टोची लागण होते. त्यामुळे लेप्टोला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १४ दिवसांत १९ हजार ८०२ उंदीर मारले. विषारी गोळ्या घालून ४२२ उंदीर मारले, तसेच पिंजरे लावून पकडून १ हजार ४९० उंदीर मारले. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी उंदीर मारण्यासाठी राबवण्यात आलेल्या मूषक संहारण मोहिमेत १७ हजार ८९० उंदीर मारण्यात आले आहेत. ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वत:हून औषध घेणे टाळा आणि घराजवळील महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना किंवा रुग्णालयात जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या - डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका हेही वाचा - शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग- पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल मुंबईतील रुग्णांची संख्या आजार - जून - जुलै - १४ ऑगस्टपर्यंतमलेरिया - ४४३ - ७९७ - ५५५डेंग्यू - ९३ - ५३५ - ५६२लेप्टो - २८ - १४१ - १७२गॅस्ट्रो - ७२२ - १२३९ - ५३४कावीळ - ९९ - १४६ - ७२चिकनगुनिया - ० - २५ - ८४स्वाईन फ्लू - १० - १६१ - ११९