गडेकरांचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे आणि कांबळी यांच्यावर नव्याने आरोप

मुंबई: नाट्यपरिषदेचे तहहयात विश्वास्त शरद पवार यांच्या सहीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष म्हणून भूमिका घेत नरेंद्र गडेकर यांनी बुधवारी माध्यमांकडे एक लेखी पत्र दिले. या पत्रात  विश्वास्तांनी १८ फे ब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या नियामक मंडळ विशेष सभेतील निर्णयांची अंमलबजावणी करावी असे मत पत्राद्वारे व्यक्त के लेले असतानाही प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी कोणतीही कार्यवाही के लेली नाही. पोंक्षे आणि कांबळी मनमानी कारभारात अडकले असून ते वारंवार परिषदेच्या घटनांची पायमल्ली करत असल्याचा आरोप गडेकर यांनी नव्याने के ला आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा वाद धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असतानाच परिषदेच्या विश्वास्त मंडळातील रिक्त जागा भरण्यासंदर्भातील तहहयात विश्वास्त शरद पवार आणि शशी प्रभू यांच्या सहीचे पत्र गडेकर यांना प्राप्त झाले. हे पत्र मिळताच नाट्यपरिषदेचा अध्यक्ष म्हणून भूमिका घेत गडेकर यांनी विश्वास्त मंडळातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात पुढील १५ दिवसांत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यासाठी प्रमुख कार्यवाह म्हणून शरद पोंक्षे यांनी सहकार्य करावे असे आवाहनही गडेकर यांनी नियामक मंडळ सदस्यांच्या वतीने करत असल्याचे पत्रात नमूद के ले आहे. पोंक्षे यांनी आत्तापर्यंत कोणतीही सभा घेतलेली नाही. १३ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत कार्यकारी समिती बहुमत सिध्द करेल अन्यथा आम्ही राजीनामे देऊ असे पोंक्षे यांनी म्हटले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने १८ फे ब्रुवारीला नियामक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली होती. ती सभा होऊ नये यासाठी कायदेशीर अडथळा आणण्याचा प्रयत्न प्रसाद कांबळी यांनी के ला, मात्र सभा  झाली. या सभेतील निर्णयांची अंमलबजावणी करण्याबद्दल तहहयात विश्वास्तांनी सांगितले असूनही विश्वास्त मंडळांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही पोंक्षे करत नसल्याचा आरोप गडेकर यांनी पत्रात के ला आहे.  यासंदर्भात  मुळात गडेकर अध्यक्ष आहेत हे त्यांनी सिध्द करावे, असे शरद पोंक्षे म्हणाले. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सभेत जोपर्यंत घटनादुरुस्ती होत नाही तोपर्यंत पदे भरायची नाहीत हा ठराव मंजूर झाला होता. अजून घटनादुरूस्ती झालेली नसल्याने हा प्रशद्ब्राच येत नाही. कोणतेही निर्णय घेण्यासाठी कार्यकारिणी, विश्वास्त मंडळ आणि नियामक मंडळाची बैठक व्हावी लागते. या तिघांची एकत्रित बैठक आयोजित करण्याचा अधिकार कार्यवाह म्हणून माझा आहे आणि गडेकरांनीही कार्यवाह म्हणून ती जबाबदारी मला पूर्ण करण्यास सांगितली आहे. मात्र करोना काळात नाट्यगृहेच बंद असल्याने अशाप्रकारची कोणतीही सभा आयोजित करण्यात आलेली नाही, असे पोंक्षे यांनी स्पष्ट के ले.

लवकरच विश्वास्तांबरोबर बैठक…गडेकर हे अध्यक्ष आहेत असे शिक्कामोर्तब धर्मादाय आयुक्तांकडून झालेले नाही. त्यांच्याकडून तसा अध्यक्ष बदलाचा अहवाल आल्याशिवाय गडेकर अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या कार्यरत असू शकत नाहीत. संबंधित प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असतानाही पवार यांच्या सहीचे पत्र गडेकरांना कसे प्राप्त झाले याची माहिती माझ्याकडे नाही. त्यासाठी लवकरच तहहयात विश्वास्तांची वेळ घेऊन त्यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात येईल, असे पोंक्षे यांनी सांगितले.