चार जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची नियुक्ती मॅटकडून रद्द

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने निकषात न बसणाऱ्या चार अपात्र उमेदवारांची जिल्हा माहिती अधिकारी पदावर नियुक्ती करताना राबविलेली भरती प्रक्रियाच सदोष असल्याचा निर्वाळा देत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) ही प्रक्रियाच बेकायदा ठरवून रद्द केली आहे.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने निकषात न बसणाऱ्या चार अपात्र उमेदवारांची जिल्हा माहिती अधिकारी पदावर नियुक्ती करताना राबविलेली भरती प्रक्रियाच सदोष असल्याचा निर्वाळा देत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट)  ही प्रक्रियाच बेकायदा ठरवून रद्द केली आहे.त्यानुसार किरण मोघे, मीनल जोगळेकर, वर्षां आंधळे व कीर्ती मोहरील या चार अधिकाऱ्यांना सेवेतून तत्काळ काढून टाकण्याबरोबरच या भरती प्रक्रियेची मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जिल्हा माहिती अधिकारी पदासाठी सन २००८ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. भरती प्रक्रियेतून किरण मोघे, मीनल जोगळेकर, वर्षां आंधळे व कीर्ती मोहरील यांची निवड करण्यात आली होती. मात्र त्या वेळी आणखी एक उमेदवार संजय भोकरडोळे यांना लेखी परीक्षेला अपात्र ठरविण्यात आले. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर भोकरडोळे यांनाही परीक्षेला बसू देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली मात्र त्याचा निकाल जाहीर न करताच अन्य चार उमेदवांची निवड करण्यात आली. त्यावर भरती प्रक्रियेसाठी आपण पात्र असूनही डावलल्याचा आरोप करीत भोकरडोळे यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. त्यावर मॅटचे अध्यक्ष न्या. राजीव अग्रवाल आणि न्या.आर.बी. मलिक यांनी वरील आदेश दिला असून चौघांच्याही नियुक्त्या बेकायदा ठरविल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे भोकरडोळे यांना परीक्षेला बसू देण्यात आले मात्र त्यांचा निकाल का लावण्यात आला नाही असा सवाल करतानाच भरती प्रक्रियेतील अटीनुसार या उमेदवारांनी नॉन क्रीमीलियरचे प्रमाणपत्र दिलेले नाही, असे स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: District information officers appointed

ताज्या बातम्या