ऐश्वर्या नारकर यांच्याशी ‘सुवर्ण’संवाद

ग्राहकांचा उत्साह आणि सराफांची लगबग सुरू असताना ‘ऐश्वर्या’ भेटीची ही संधी आनंदाचा गोडवा अधिकच वाढवून गेली.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचे स्वागत करताना एम. के. घारे ज्वेलर्सचे उदय घारे, शुभ घारे आणि शिवम घारे.

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’ला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; योजनेचा लाभ फक्त दोन दिवस

मुंबई : ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजनें’तर्गत बुधवारी कांदिवली येथील एम. के . घारे ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना भेटण्याची संधी मिळाली. हा सुवर्णयोग ग्राहकांना अधिकच भावला. सोने खरेदीवर बक्षिसांची लयलूट करण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’ला आता दोनच दिवस शिल्लक असून हा सुवर्ण खरेदीचा क्षण साधण्यासाठी घाई करावी लागणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि रुणवाल ग्रुप सहप्रायोजित ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’ला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ५ नोव्हेंबपर्यंत सोने खरेदीचा हा जल्लोष सुरू राहणार आहे. बुधवारी कांदिवली येथील एम. के . घारे ज्वेलर्सला अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी दुपारी १ च्या सुमारास भेट दिली. ग्राहकांचा उत्साह आणि सराफांची लगबग सुरू असताना ‘ऐश्वर्या’ भेटीची ही संधी आनंदाचा गोडवा अधिकच वाढवून गेली.

 सहभाग कसा घ्याल?

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना एका बिलावर एक प्रवेशिका दिली जाईल. ही प्रवेशिका पूर्ण भरून तेथील ड्रॉप बॉक्समध्ये टाका आणि एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशी आकर्षक बक्षिसे जिंका. या योजनेच्या शेवटच्या दिवशी सर्व दुकानांमधून प्रवेशिका जमा केल्या जाणार आहेत. या सर्व प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत

प्रायोजक :‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे सह प्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि रुणवाल ग्रुप, प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू आणि एम. के. घारे ज्वेलर्स. गोल्ड पार्टनर -श्री नेमिनाथ ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कंपनी, तर सिल्व्हर पार्टनर वाकडकर ज्वेलर्स आणि चिंतामणीज् ज्वेलर्स हे आहेत. तसेच आय के आर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय हे असून उषा एजन्सी गिफ्ट पार्टनर आहेत..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali 2021 actress aishwarya narkar loksatta suvarna labh yojana zws

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या