सोने खरेदीवर आकर्षक बक्षिसांची लयलूट

मुंबई : दिवाळीच्या खरेदीत सोन्याच्या खरेदीला मानाचे स्थान असते. आपण के लेल्या सोन्याच्या खरेदीवर बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’ला बुधवारपासून धडाक्यात सुरुवात झाली. दिवाळीच्या निमित्ताने अगदी एक ग्रॅम सोन्यापासून ते पारंपरिक वा आधुनिक दागिन्यांपर्यंत काही ना काही सोने खरेदी हमखास के ली जाते. गेल्या वर्षी करोनामुळे राहून गेलेली ही सोने खरेदीची इच्छा पूर्ण करताना आकर्षक बक्षिसांची लयलूट या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना करता येणार आहे.

Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश
maharashtra gst collection more than three lakh crore in march 2024
राज्यात ‘जीएसटी’पोटी वर्षभरात तीन लाख कोटींहून अधिक संकलन
exam, exam paper
परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; आता २ ते ४ एप्रिलऐवजी ४ ते ६ एप्रिल दरम्यान परीक्षा
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

खरेदीचा हा सुवर्णयोग २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सहप्रायोजित ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’मुळे जुळून आला आहे.

सहभाग कसा घ्याल?

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना एका बिलावर एक प्रवेशिका दिली जाईल. ही प्रवेशिका पूर्ण भरून तेथील ड्रॉप बॉक्समध्य टाका आणि एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन अशी आकर्षक बक्षिसे जिंका. 

या योजनेच्या शेवटच्या दिवशी सर्व दुकानांमधून प्रवेशिका जमा केल्या जाणार आहेत. या सर्व प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

प्रायोजक

‘एमआयडीसी’ सहप्रायोजित ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू आणि एम. के. घारे ज्वेलर्स आहेत. गोल्ड पार्टनर श्री नेमिनाथ ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कं पनी आहेत, तर सिल्व्हर पार्टनर वाकडकर ज्वेलर्स आणि चिंतामणीज् ज्वेलर्स आहेत. तसेच आय के अर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय आहेत.