मुंबई : मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. गणेशोत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा मोठा पारंपरिक उत्सव आहे. यासाठी लागणाऱ्या पीओपी मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या तांत्रिक समितीचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालणे अशास्त्रीय, असंविधानिक आणि अयोग्य ठरेल, अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मांडली आहे. 

येत्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमुर्तीवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केला होता. या निर्णयाला मूर्तिकारांकडून विरोध होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघ आणि मुंबईतील मूर्तिकार संघटनेच्या प्रतिनिधींची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत गुरुवारी बैठक झाली. त्यावेळी आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवडय़ामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या बाबतीत जे निर्णय घेतले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र पीओपीच्या चार फुटांखालील गणेश मूर्तीवर बंदी घालण्यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही.

Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

 मुंबई महापालिकेने समुद्र स्वच्छ होण्यासाठी, प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी योग्य यंत्रणा का निर्माण केली नाही, घरातून निघणाऱ्या सांडपाण्याने वर्षांनुवर्षे मुंबईतील समुद्र खराब होत असून त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याबाबत २५ वर्ष महापालिकेतील सत्ताधारी झोपले होते काय? असा सवाल करत आज गणपतीच्या मूर्तीमुळेच जणूकाही समुद्र आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतोय असे भासवले जात आहे. या गोष्टी आम्हाला कदापि मान्य नाहीत. आमची भूमिका सरकारपुढे मांडली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव विसर्जनाचा मार्ग ठरलेला आहे. त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत काटेकोर अंमलबजावणी व्हावी, गणेशोत्सवात इलेक्ट्रॉनिक साहित्य न वापरता रात्री दहा नंतर काहीकाळ आरत्या सुरू राहिल्या तर त्यात अडकाठी आणता कामा नये, अशीही आमची मागणी आहे, असे शेलार म्हणाले.