* भारत, आफ्रिकेमध्येच आढळतो सबमायट्रल ॲन्युरिसम आजार * २५ वर्षांच्या तरुणाला दिले जीवदान

विनायक डिगे, लोकसत्ता

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

दोन आठवड्यापासून दम लागत असल्याने डॉक्टरकडे आलेल्या गोवंडीतील एका तरुणाला सबमायट्रल ॲन्युरिसम हा हृदयाचा दुर्मिळ आजार झाल्याचे स्पष्ट झाले. हा आजार शेवटच्या टप्प्यात असून, थोडासा विलंब झाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मात्र केईएम रुग्णालयातील हृदय शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी तब्बल आठ तास हृदयावर शस्त्रक्रिया करून २५ वर्षीय तरुणाचे प्राण वाचविले.

 दोन आठवड्यांपासून दम लागत असल्यामुळे गोवंडी येथे राहणारा शाफत अली मोहम्मद हनिफ (२५) स्थानिक डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या चाचण्या केल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये काही दोष असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला केईएम रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी जाण्यास सांगितले. हनिफ केईएम रुग्णालयातील हृदयरोगशास्त्र विभागामध्ये उपचारासाठी आला. तेथील डॉक्टरांनी त्याची अँजिओग्राफी आणि इको यासह काही चाचण्या केल्या असता, त्याच्या हृदयाच्या डाव्या बाजूच्या खालील कप्प्याचा थर कमकुवत होऊन तेथे फुगा (सबमायट्रल ॲन्युरिसम टाईप ३) आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हनिफला तातडीने हृदय शल्यचिकित्सा विभागाकडे हस्तांतरित केले.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला दररोज लागतात ६,८०० चपात्या – तीन वर्षांचे कंत्राट दोन कोटी रुपयांवर

हनिफची तपासणी केली असता त्याच्या हृदयाला आलेला फुगा हा फार दुर्मिळ आजाराचा प्रकार आहे. हृदयाला आलेल्या फुग्यातील रक्त साकळल्यास हृदयात रक्ताची गुठळी तयार होऊन ती संपूर्ण शरीरात पसरल्यास लकवा होण्याचा किंवा हातापायाला गॅगरीन होण्याची शक्यता होती. हनिफच्या हृदयाच्या कप्प्याला आलेल्या फुगा हा शेवटच्या स्तरावर असल्याने तो कधीही फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे हृदय शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी ऐरोनी यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सकाळी ११.३० वाजता शस्त्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सायंकाळी ७.४० पर्यंत सुरू होती. तब्बल आठ तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान बोवाईन पेरिकार्डियमचा वापर करून हनिफच्या हृदयाला आलेल्या फुग्याचे ताेंड आतील बाजूने बंद करण्यात आले. हृदयाला आलेला हा फुगा डाव्या कप्प्याच्या झडपेच्या खाली होता. त्यामुळे या झडपेला इजा झाली होती. या झडपेवर उपचार करण्यात आले. आता हनिफची प्रकृती स्थिर असून, त्याला विशेष वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे डॉ. बालाजी ऐरोनी यांनी सांगितले. 

सबमायट्रल ॲन्युरिसम या प्रकाराचा हा आजार फारच दुर्मिळ असून, हा आजार १० लाखांमध्ये एका व्यक्तीला होण्याची शक्यता असते. हा आजार जन्मत: किंवा जंतूसंसर्गामुळे होतो. हा आजार साधारणपणे भारत आणि आफ्रिका येथे आढळून आलेला आहे. केईएम रुग्णालयामध्ये मागील १० वर्षांमधील ही चौथी शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. बालाजी ऐरोनी यांनी सांगितले.

महात्मा फुले योजनेंतर्गत झाली शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारणपणे १० ते १२ लाख रुपये इतका खर्च येतो. मात्र केईएम रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया महात्मा फुले आरोग्य विमा योजनेंतर्गत करण्यात आली. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपये इतका खर्च आला. अशी केली शस्त्रक्रिया हृदयाच्या डाव्या बाजूच्या खालील कप्प्याचा थर कमकुवत होऊन तेथे फुगा (सबमायट्रल ऍन्युरिसम टाईप ३) असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हनिफवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया हृदयावर करायची असल्याने प्रथम हनिफवरील शस्त्रक्रिया सुरू केल्यानंतर त्याच्या हृदयाला भूल देऊन त्याचे काम थांबवण्यात आले. हृदयाचे काम थांबवताना शरीराला रक्तपुरवठा व्हावा यासाठी यांत्रिक पंपाद्वारे त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यानंतर हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर टप्प्याटप्याने हृदयाची क्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली.