डोंबिवली: वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

इतकेच नव्हे हा तर नराधम स्वतःच्या आठ महिन्याच्या मुलीला जबदरस्तीने दारू पाजायचा.

rape
(प्रातिनिधिक छायाचित्र)

आपल्या पोटच्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवली पश्चिमेत उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे हा तर नराधम स्वतःच्या आठ महिन्याच्या मुलीला जबदरस्तीने दारू पाजायचा. याचा विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला देखील आरोपी बेदम मारहाण करायचा.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विष्णूनगर पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. तर आज आरोपीला कोर्टात हजर केले जाईल, असं पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितलं.

डोंबिवलीमध्ये सदर पीडित ९ वर्षीय मुलगी आई वडिलांसोबत राहते. आई कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून आरोपी बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर तिला शिवीगाळ, मारहाण करत धमकी दिली. याबाबत घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला.

यानंतरही आरोपी मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन बायकोशी भांडायचा आणि आठ महिन्याच्या मुलीला दारू पाजत असे. याला विरोध केला म्हणून त्याने आपल्या पत्नीला देखील बेदम मारहाण केली. अखेर या प्रकरणी सदर पीडितेने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी विकृत बापाला बेड्या ठोकल्यात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dombiwali father raped his 9 years old daughter vsk

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या