मुंबई : तुमची राजकीय लढाई तुम्हा राजकारणाच्या पातळीवर लढा त्यात अधिकाऱ्यांना ओढू नका, असा इशारावजा सल्ला पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी भाजपचे नेते मोहीत कंबोज यांना दिला आहे. कंबोज यांनी पालिका आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असून हे आरोप फेटाळतानाच आयुक्तांनी हे वक्तव्य केले आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तीकर विभागाने छापे मारून ७२ तास शोधमोहीम राबवली होती. या चौकशीत जाधव यांनी मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार करून २०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र पालिकेतील मोठय़ा विकासकामांचे प्रस्ताव स्थायी समितीकडे येण्यापूर्वी त्याला आयुक्तांची मंजुरी लागते. त्यामुळे या भ्रष्टाचारात आयुक्तांचाही समावेश असल्याचा आरोप कंबोज यांनी समाजमाध्यमांवरून केला. आयुक्तांनी भ्रष्टाचार करून परदेशात अमेरिकेत मालमत्ता गोळा केली असल्याचा आरोपही कंबोज यांनी केला आहे. तसेच काळय़ा यादीतील कंत्राटदारांना करोनाकाळात कामे दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  हे सर्व आरोप आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. हे सर्व आरोप धादांत खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा आरोप आयुक्तांनी केला आहे. निष्कारण आपल्याला वादात ओढले जात असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे. अमेरिकेत आपली कोणतीही  मालमत्ता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान