मध्य रेल्वेच्या नव्या वेळापत्रकानुसार रात्री १२.३८ मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जतला जाणारी शेवटची गाडी १२.३० वाजता रवाना होणार आहे. त्यामुळे शेवटची गाडी पकडण्यासाठी आता प्रवाशांना अधिकच लगबग करावी लागणार आहे. त्याचबरोबर शेवटची गाडी चुकली तर पहाटेच्या पहिल्या गाडीची वाट पाहण्याच्या वेळेतही रेल्वेने बिनदिक्कत वाढ केली आहे. आता सीएसटीहून कसाऱ्यासाठी सुटणारी पहिली गाडी ही पहाटे ४.०५ ऐवजी ४.१२ला सुटणार आहे. सीएसटी ते कुर्ला, ठाणे गाडय़ांचा प्रवास कल्याण व त्यापुढे नेल्याने ठाणे-कल्याण मार्गावरील गाडय़ांची संख्या १३ने वाढली आहे.

* अप वेळापत्रक येथे डाऊनलोड करा.          
* डाऊन वेळापत्रक  येथे डाऊनलोड करा.

Indian Railway completes 171 years Boribandar to Thane local ran on 16 April 1853
भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
Pune Division , Central Railway, miraj, mega Block , 29 march 2024, Trains Cancelled, Rescheduled,
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

नवे वेळापत्रक गंतव्यस्थानात बदल
*सकाळी ६.५०ची टिटवाळा-कुर्ला गाडी आता सीएसटीपर्यंत
*सकाळी ९.०२ची बदलापूर-दादर गाडी आता सीएसटीपर्यंत
*सकाळी ७.१०ची आसनगाव-कल्याण गाडी आता सीएसटीपर्यंत
*रात्री ९.५६ची कर्जत-ठाणे गाडी आता सीएसटीपर्यंत.
*सायंकाळी ५.००ची सीएसटी-ठाणे गाडी आता कल्याणपर्यंत
*सायंकाळी ५.०४ची सीएसटी-कुर्ला गाडी आता ठाण्यापर्यंत
*सायंकाळी ६.१७ची सीएसटी-कुर्ला गाडी आता कल्याणपर्यंत
*सायंकाळी ८.०५ची कुर्ला-डोंबिवली गाडी आता कल्याणपर्यंत
*रात्री ९.४२ची सीएसटी-डोंबिवली गाडी आता कल्याणपर्यंत
*रात्री ९.४९ची सीएसटी-कल्याण गाडी आता बदलापूपर्यंत
*रात्री १०.३८ची सीएसटी-अंबरनाथ गाडी आता बदलापूपर्यंत

गाडी सुटण्याचे स्थानबदल
*सकाळी ५.५२ची कल्याण-सीएसटी गाडी आता ५.३६ वा. टिटवाळा-सीएसटी
*सकाळी ५.२१ची कल्याण-सीएसटी गाडी आता ५.०५ वा. अंबरनाथ-सीएसटी
*सकाळी ५.४६ची अंबरनाथ-सीएसटी गाडी आता ५.४२ वा. बदलापूर-सीएसटी
*सकाळी ६.४०ची कल्याण-सीएसटी गाडी आता ६.१४ वा. बदलापूर-सीएसटी
*सकाळी ९.०४ची ठाणे-कर्जत गाडी आता ८.२९ वा. सीएसटी-कर्जत.