scorecardresearch

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या कामाचा मुख्यमंत्री आढावा घेणार ; खा. राहुल शेवाळे यांची माहिती

दादरमधील इंदू मिलच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

मुंबई : दादरमधील इंदू मिलच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. महिन्याभरात मुख्यमंत्री कामाची पाहणी करणार असून कामाला गती देऊन २०२४ पर्यंत स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते निर्देश देतील, असेही ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मूळ आराखडय़ात अनेक बदल झाल्याने, तसेच करोना, टाळेबंदीचा फटका बसल्याने कामास विलंब झाला. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्मारकाच्या कामास मार्च २०२४ पर्यंतची मुदतवाढ दिली
आहे. यासंबंधीच्या वृत्ताची दखल घेत राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री महिन्याभरात स्मारकाच्या कामाची पाहणी करतील आणि कामाचा आढावा घेतील असे स्पष्ट केले. करोनाकाळात मजूर नसल्याने कामाला मोठा फटका बसला आहे; पण आता मात्र जलदगतीने स्मारकाचे काम २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr chief minister review work ambedkar memorial information rahul shewale amy

ताज्या बातम्या