डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण; तीन आठवड्यांत CBI भूमिका स्पष्ट करणार | dr narendra dabholkar murder case complete report subimitted delhi cbi headquarters say cbi mumbai high court ssa 97 | Loksatta

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण; तीन आठवड्यांत CBI भूमिका स्पष्ट करणार

३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष याप्रकरणी नोंदवण्यात आली आहे.

Dabholkar
नरेंद्र दाभोळकर ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच, नव्याने सुरु केलेला तपासही पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पाठवला आहे. येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आज ( ३० जानेवारी ) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. तेव्हा अनिल सिंग यांनी सांगितलं की, “डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. ३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तपास करण्याची गरज नाही. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात तपासाचा अहवाल पाठवण्यात आला आहे. यावर तीन आठवड्यांत सीबीआय आपला निर्णय जाहीर करेल,” असं सिंग म्हणाले.

हेही वाचा : “जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करायचे भाजपाचे षडयंत्र” काँग्रेस नेते सचिन सावंतांचा गंभीर आरोप!

तसेच, याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असून, पुणे सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने तपासावर आता देखरेख ठेऊ नये, अशी मागणी आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांनी न्यायालयात केली. याला दाभोलकर कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी विरोध दर्शवला.

हेही वाचा : डोंबिवलीत बेकायदा इमारती बांधणाऱ्या ११ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे; ह, फ प्रभागाची आक्रमक कारवाई

“दाभोलकर हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. हत्येसाठी वापरलेली दुचाकी आणि हत्यार सापडलेले नाही. हत्येचं कारण समोर आलं नसून, सूत्रधारचा शोध लागला नाही. त्यामुळे याप्रकरणात उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक आहे,” असं नेवगी यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:41 IST
Next Story
मुंबई : सहा ते नऊ महिन्यांच्या बालकांच्या लसीकरणाची व्याप्ती वाढवणार