स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई मेट्रोच्या वतीने खुल्या प्रवर्गातील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘माझी मेट्रो, रंग दे मेट्रो’ असं या स्पर्धेचं नाव होतं. या स्पर्धेत १२ राज्यांतील तब्बल ३४०० कलाकारांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत मुंबईच्या १४ वर्षीय वेदांत शिंदे याचा देखील समावेश होता. वेदांतने ‘मुंबई स्पिरिट’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला साकारली होती. मुंबईचा वेदांत या ३४०० स्पर्धकांमधील सर्वात लहान स्पर्धक असल्याने त्याला ‘विशेष स्पर्धक’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेदांतचे हे चित्र मुंबईतील अंधेरी येथील डी. एन. नगर मेट्रो स्थानकावरील मोठ्या भिंतीवर लावण्यात येणार आहे. यामुळे वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई ज्या गोष्टींसाठी ओळखली जाते त्याची सर्व चित्र एकत्रित करून वेदांतने हे चित्र रेखाटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drawing of 14 year old vedant will be displayed at mumbai metro station pvp
First published on: 18-12-2021 at 12:14 IST