मुंबई : मुंबई महापालिकेने वाहनचालक पदाच्या ५६ जागा भरण्याचे ठरवले आहे. मात्र या जागा अंतर्गत पद्धतीनेच भरण्यात येणार आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. समान वेतन श्रेणीच्या, मराठी लिहिता – वाचता येणाऱ्या कामगारांना याकरीता अर्ज करता येणार आहेत.

कार्यकारी अभियंता (परिवहन) पाणीपुरवठा मलनिस्सारण या कार्यालयाच्या आस्थापनेवरील वाहनचालक या संवर्गातील ५६ रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. त्याकरीता संबंधित विभागाने पालिकेच्या सर्व खाते व विभागातील कामगार व तत्सम वेतनश्रेणीतील पात्र व इच्छुक कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक कामगारांना १६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. समान वेतनश्रेणी असलेल्या कामगारांकडून हे अर्ज मागवण्यात आले असून त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. ५६ जागांपैकी १६ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.

PAN 2.0 Apply Online Step By Step Guide For Your Application in marathi
PAN 2.0 Apply Online: नवीन पॅन कार्ड काही मिनिटांत येईल तुमच्या ईमेलवर; फक्त फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
supreme court on election commission of india
SC to EC: मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या १२०० वरून १५०० का केली? सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला विचारणा!
Today’s Gold Silver Price 2 december 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : ऐन लग्नससराईत सोन्या-चांदीचे दर गडगडले, खरेदीपूर्वी आजचा भाव किती एकदा पाहाच
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
college teacher dance in classroom went viral on social media
जरा तरी भान ठेवा…, शिक्षिकेने भरवर्गात केली हद्दच पार, VIDEO पाहून नेटकरी संतप्त
illegal inauguration hall
डोंबिवली गोळवलीतील बेकायदा शुभारंभ हाॅल भुईसपाट; उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पालिकेच्या आय प्रभागाची कारवाई

हेही वाचा – bhandup school girls molested : भांडुपमधील खासगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग

हेही वाचा – KEM Hospital : केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह कार्यान्वित, वेदनांपासून सुटका होण्यास होणार मदत

मुंबई महानगरपालिकेत तीन वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना याकरीता अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) जडवाहन चालवण्याचा किमान एक वर्षापूर्वीचा वैध परवाना असावा, उमेदवाराला मराठी लिहिता-वाचता यावे, उमेदवाराला वैद्यकीय तपासणीत पात्र ठरणे आवश्यक आहे, अशा अटी या पदभरतीकरीता घालण्यात आल्या आहेत.