scorecardresearch

झोपडपट्टय़ांचे ड्रोन सर्वेक्षण

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबईतील झोपडपट्टीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील १० अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

Maharashtra Government, Abhay Yojna, Slums Rehabilitation

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मुंबईतील झोपडपट्टीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील १० अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. हे प्राधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टय़ांचे ड्रोन सर्वेक्षण व बायोमेट्रिक सर्वेक्षण करणार आहेत. हे सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला संबंधित झोपडपट्टीधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत झोपडीधारकांना त्यांचे अधिकार प्रदान करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत उपजिल्हाधिकारी संवर्गातील १० अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील झोपडपट्टय़ांचे ड्रोन सर्वेक्षण व बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यासाठी सात दिवस आधी सूचना प्रसिद्ध करण्यात येते. त्यानुसार नोटिशीमध्ये नमूद केलेल्या दिवशी झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन तेथे ड्रोन सर्वेक्षण व बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षणाच्या वेळी झोपडीधारकांनी १६ मे २०१५ व १६ मे २०१८ या दिवशीच्या शासननिर्णयामध्ये नमूद केलेली कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून सादर करणे व आवश्यक ती माहिती देऊन सर्वेक्षण करणाऱ्या पथकास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. १ जानेवारी २००० पूर्वीचे झोपडीधारक मोफत घरे मिळण्यास पात्र आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drone survey slums biomatric ysh

ताज्या बातम्या