मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) धारावीतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडे ३३४ रिकाम्या घरांची मागणी केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत तात्पुरत्या पुनर्वसनासाठी संक्रमण शिबिरांची गरज भासणार आहे. त्यासाठी धारावी पुनर्विकासासंबंधीच्या २०१८ च्या शासन निर्णयात यासंबंधीची तरतूद करण्यात आली आहे. या घरांचा वापर संक्रमण शिबिराचे गाळे म्हणून केला जाणार आहे. ही घरे लवकरच शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून ‘डीआरपीपीएल’कडे वर्ग केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> विधानसभा जिंकण्यासाठी महायुती आमदारांसाठी भरीव तरतूद; सत्ताधाऱ्यांच्या झोळीत निधीचे वाण!

cm eknath shinde appeal workers of mahayuti
गाफील राहू नका, सडेतोड उत्तरे द्या! मुख्यमंत्र्यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Mumbai money transfer without otp
ओटीपी दिला नाही, तरी बँक खात्यातून रक्कम गायब
special funds will be provided for mahayuti mla in budget to win assembly poll zws
विधानसभा जिंकण्यासाठी महायुती आमदारांसाठी भरीव तरतूद; सत्ताधाऱ्यांच्या झोळीत निधीचे वाण!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Ghatkopar hoardings
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; होर्डिंगला परवानगी देणाऱ्या IPS अधिकाऱ्याच्या पत्नीचं कनेक्शन? अनोळखी खात्यातून व्यवहार
Postcard movement mother dairy
मदर डेअरीची जागा वाचविण्यासाठी कुर्लावासियांचे पोस्टकार्ड आंदोलन, पंतप्रधान आणि मुख्यमत्र्यांना पत्राद्वारे घालणार साकडे

धारावी पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना संक्रमण शिबिरात वा भाड्याने इतर कुठेही जाऊ लागू नये म्हणून आधी मोकळ्या जागेवर पुनर्वसित इमारतींची कामे केली जाणार आहेत. तर पात्र रहिवाशांना थेट नव्या घराचा ताबा देण्याचा प्रयत्न असल्याचे ‘डीआरपीपीएल’ -कडून सांगितले जात आहे. असे असले तरी आता ‘डीआरपीपीएल’ला संक्रमण शिबिराच्या घरांची गरज लागणार आहे. त्यामुळे, काही धारावीकरांना संक्रमण शिबिराच्या गाळ्यात राहावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘डीआरपीपीएल’मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनर्विकासाचे कंत्राट ज्या कंपनीला मिळेल त्या कंपनीला शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील घरे संक्रमण शिबिराचे गाळे म्हणून वापरता येतील, असे शासन निर्णयात नमूद आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला या घरांचा मोबदला म्हणून प्रतिगाळा ४० हजार अनामत रक्कम व दरमहा ८००० रुपये घरभाडे ‘डीआरपीपीएल’कडून दिले जाणार आहेत. धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक अॅड. राजू कोरडे यांनी धारावीतच गाळे दिले जाणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.