अर्थसंकल्प सहज समजून घेण्यासाठी…

वाचकांनाही त्यांचे शंका-प्रश्न विचारून या मंथनात सहभागी होता येईल.

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पावर विविध घटकांकडून आशा-अपेक्षांचे ओझे आहे. करोना महासाथीने गांजलेल्या नोकरदार वर्गाला करांत किती सूट मिळेल,  सरकारी तिजोरीतील उत्पन्न वाढविण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असताना जमा-खर्चाची जुळवणी अर्थसंकल्पात कशी केली जाईल, अशा विविध बाबींचा ऊहापोह ‘लोकसत्ता विश्लेषण’ उपक्रमातून केला जाणार आहे. आज, सायंकाळी ६  वाजता दूरचित्रसंवादाद्वारे होणार असलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अर्थविश्लेषक मंगेश सोमण आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर  चर्चा करणार आहेत. वाचकांनाही त्यांचे शंका-प्रश्न विचारून या मंथनात सहभागी होता येईल.

यंदा भरघोस पिकाचा दिलासा अर्थव्यवस्थेला मिळण्याचाही अंदाज आहे. मात्र करोना निर्बंध हटविण्याच्या कासवगतीने अर्थव्यवस्थेचा निम्मा हिस्सा व्यापणाऱ्या सेवा क्षेत्राची कुंठितावस्था, राज्यांचा डळमळलेला वित्तीय डोलारा, परिणामी सर्वदूर बेरोजगारी आणि भरीला महागाईचा आगडोंब अशी गंभीर आव्हाने अर्थमंत्र्यांपुढे असतील.

सहभागासाठी…

दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात सहभागासाठी http:// tiny. cc/ LS_ Budget Vishleshan_ 2022  येथे नोंदणी आवश्यक.

अर्थसंकल्प-  पूर्व विश्लेषण कधी? : आज वेळ : सायंकाळी ६ वा.

वक्ते :  ’ मंगेश सोमण,  प्रसिद्ध अर्थविश्लेषक ’ गिरीश कुबेर,  संपादक, लोकसत्ता 

’ प्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज  को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Easily understand the budget government treasury generated from loksatta analysis initiative akp

Next Story
‘महाराजा’ची घरवापसी!; सात दशकांनंतर ‘एअर इंडिया’ पुन्हा टाटा समूहाकडे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी