मुंबई : पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे ये-जा करण्यासाठी जलद मार्ग असलेल्या पूर्वमुक्त मार्गाचा आणखी दक्षिणेकडे विस्तार करून तो मरिन ड्राइव्हशी जोडण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यांनी केले आहे. पी. डीमेलो रोड ते मरिन ड्राइव्ह असा हा विस्तार करण्यात येणार असून त्यामुळे पूर्व उपनगरांतून दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना आता थेट नरिमन पॉइंट, मंत्रालयापर्यंत थेट जाता येणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरे थेट जोडण्यासाठी १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधण्यात आला. पी. डीमेलो रोड ते चेंबूर दरम्यानच्या या पूर्वमुक्त मार्गामुळे २०१३ पासून प्रवास वेगवान झाला आहे. पी. डीमेलो रोडवरून वेगात चेंबूरला पोहोचल्यानंतर पुढे ठाण्याला जाण्यासाठी वाहनचालक, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन छेडानगर ते ठाणे असा पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया एमएमआरडीएकडून सुरू आहे. असे असताना आता मुंबईच्या दिशेनेही पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चर्चगेट, मरिन ड्राइव्ह येथील  कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पूर्वमुक्त मार्गाचा मरिन ड्राइव्हपर्यंत विस्तार करता येतो का यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक घेतली. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याशी चर्चा केली. हे विस्तारीकरण शक्य आहे का? यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.  आता याची व्यवहार्यता तपासत पुढील निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. हे विस्तारीकरण झाल्यास वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…