scorecardresearch

मुंबई पारबंदर प्रकल्पामुळे नवी मुंबईचा आर्थिक विकास – मुख्यमंत्री

मुंबई पारबंदर प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल.

मुंबई पारबंदर प्रकल्पामुळे नवी मुंबईचा आर्थिक विकास – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल. येथील आर्थिक विकास केंद्राच्या माध्यमातून नवी मुंबई आणि सागरी सेतूच्या आसपासच्या परिसराचा आर्थिक विकास होईल, असा आशावाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या प्रकल्पातील पाचव्या मोठय़ा लांबीच्या, १८० मीटरच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी बुधवारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

आतापर्यंत या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम नोव्हेंबरला पूर्ण करून हा सेतू डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. अशा या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा बुधवारी पूर्ण करण्यात आला. पाचव्या सर्वात मोठय़ा लांबीच्या (१८०) ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची उभारणी करण्यात आली.

सागरी सेतू अधिक मजबूत करण्यासाठी आणि मोठय़ा बोटी सेतूखालून जाणे सोपे व्हावे यासाठी ८५ ते १८० मीटर लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक या परदेशी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. देशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. टप्पा १ आणि २ मध्ये असे एकूण ७० ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक बसविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई अंतर २० ते २२ मिनिटांत पार होणार आहे. एमएमआरडीए सात आर्थिक केंद्रे विकसित करणार असून यातील एक केंद्र नवी मुंबई येथे असणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 03:52 IST

संबंधित बातम्या