मुंबई : मुंबै बँकेतील १२३ कोटी रुपयांच्या कथित घोटाळय़ाप्रकरणी गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह इतर संचालकांची नावे वगळण्यात आली आहेत. याप्रकरणी सर्वाविरोधात पुरावा नसल्याचे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. त्यामुळे दरेकर यांच्यासह इतर संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रवीण दरेकर हे २००० सालापासून मुंबै बँकेचे संचालक होते. तसेच ते २०१० पासून बँकेचे अध्यक्ष आहेत. मुंबै बँकेच्या मुंबईतील कांदिवली, ठाकूर व्हिलेज, दामुनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती २०१५ मध्ये उघड झाली होती. या घोटाळय़ाप्रकरणी विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. १९९८ पासून १२३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपत्रामध्ये दहा मजूर संस्थांना आरोपी केले आहे. मात्र, दरेकर आणि इतर संचालकांच्या सहभागाबाबत कोणताही पुरावे सापडला नसल्याचे म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic offenses branch clean chit to bjp pravin darekar in mumbai bank scam zws
First published on: 03-12-2022 at 05:20 IST