अनिल देशमुख पाचव्यांदा चौकशीला गैरहजर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीला पाचव्यांदा जाणे टाळले. अनिल देशमुख यांनी त्यांच्या वकिलामार्फत तीन पानी पत्र ईडीकडे पाठवले होते. अनिल देशमुख यांचा मुलगा हृषीकेश यांनाही ईडीने समन्स बजावले होते, मात्र तेही चौकशीला उपस्थित नव्हते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मनी लाँड्रिंग कायद्यान्वये ईडी ही चौकशी करते आहे. याप्रकरणी देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा ईडीने समन्स बजावले होते, मात्र देशमुख एकाही चौकशीला हजर झाले नाहीत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कायद्यातील तरतुदींचा अवलंब करून गुन्हा रद्दीकरणासाठी अपील करण्यापासून ते अन्य उपायांचा अवलंब करण्याची मुभा दिली आहे. या कायदेशीर उपायांचा अवलंब करेपर्यंत कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

याचिका फेटाळली

नवी दिल्ली: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात  दाखल करण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करावा अशी मागणी करणारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ed anil deshmukh absent for the fifth time akp

ताज्या बातम्या