aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान
Sunita Kejriwal reads Arvind Kejriwal massage
अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून संदेश; म्हणाले, “भाजपाचा द्वेष करू नका…”
ed claims in court arvind kejriwal key conspirator in liquor policy
केजरीवालच मुख्य सूत्रधार; मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा; सहा दिवसांची कोठडी

मुंबई: परिवहनमंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. अनिल परब यांना मंगळवारी (२८ सप्टेंबर) ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. केंद्रीय यंत्रणेने परब यांना पाठवलेले हे दुसरे समन्स आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने समन्स पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आले आहे. त्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या जबाबात देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात पोलिसांच्या बदल्यांसाठी २० कोटी रुपये घेण्यात आल्याचा आरोप वाझेंनी केला होता. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात ते आरोप होते. तळोजा कारागृहात जाऊन ईडीच्या तुटवडा टाळण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहनअधिकाऱ्यांनी सचिन वाझेंचा ईडीने जबाब नोंदवला होता. यापूर्वी परब यांना ३१ ऑगस्टला ईडीने समन्स पाठवण्यात आले होते. मात्र त्या वेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती.