महाराष्ट्र सदन आणि अन्य गैरव्यवहारांप्रकरणी सध्या अटकेत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आता आणखीनच भर पडणार आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अटक केलेले भुजबळांचे सनदी लेखापाल (सीए) सुनील नाईक यांनी गुरूवारी न्यायालयात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे भुजबळांच्या गैरव्यवहारांचा संपूर्ण तपशील उघड होण्याची शक्यता आहे. ईडीने आज सकाळी सुनील नाईक यांना त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रींग प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि सुनील नाईक यांच्यासह आणखी ३४ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. नाईक हे भुजबळांच्या वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टचे सीए होते. याशिवाय, समीर आणि छगन भुजबळ यांच्या पैशांच्या हवालामार्फत अफरातफरी आणि महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानण्यात येतो. त्यामुळेच ईडीने भुजबळांभोवतीचे फास आवळण्यासाठी नाईकांना गळाला लावल्याची चर्चा आहे. माफीचा साक्षीदार बनवण्याच्या अटीवरच सुनिल नाईक यांनी इडीला सर्व माहिती पुरवल्याची माहिती इडी सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सुनिल नाईक यांची औपचारिक अटक दाखवून पुढे जामिन देण्याच्या अटींवर अटक करण्यात आल्याची माहिती इडी सुत्रांनी दिली आहे.

Ghodbunder, Citizens Ghodbunder protest,
घोडबंदरमधील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
A case has been registered against BJP MLA Parinay Phuke and his family Nagpur news
भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यासह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल, दिवंगत भावाच्या पत्नीची पोलिसात तक्रार
jp nadda slams Kangana Ranaut marathi news
जे.पी. नड्डा यांच्याकडून कंगना यांची कानउघाडणी
Shekhar Khambete, tabla maestro shekhar khambete, tabla maestro, theater, Vijaya Mehta, artistic legacy, versatile artist, musical heritage
शेखर खांबेटे : एक कलंदर तबलावादक…
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती