Mumbai Breaking News Updates : मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत सक्त वसुली संचालनालयाने(ईडी) १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. त्यात १३ आरोपींच्या मुंबई व केरळतील कोची येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या पथकातील पोलीस बसमधून प्रवास करून, छेडछाड आणि चोरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार असल्याने महिला प्रवाशांचा प्रवास आता सुकर होणार आहे. तेव्हा मुंबई, मुंबई महानगर, पुणे शहर आणि परिसर, नागपूर शहरातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 6 June 2025
फसवणूक, नोकरीचे आमिष! ब्रम्हपुरीतील बेरोजगारांनाही ‘रोशनी’चा गंडा…
देशात उन्हाळी हंगामात विक्रमी लागवड, जाणून घ्या पीकनिहाय पेरण्यांमधील वाढ
औद्योगिक पट्ट्यातील २६ सराईत तडीपार
यंत्र जप्तीप्रकरणी मध्यस्थ अटकेत
एल.ओ.सी. ओलांडणाऱ्या सुनीतला ताब्यात घेण्यात कारगिल पोलिसांना अडचणी
विरोधकांशी नव्हे तर, प्रतिस्पर्धी मित्रपक्षांशी लढाई, भाजपच्या बैठकीत नेत्यांचा सूर
सोन्याचे दरात चार तासातच घसरण… ‘बकरी ईद’च्या तोंडावर…
भिवंडीत एकाकडून पत्नीची हत्या
ठाणे : भिवंडी येथील ताडाळी भागात मंजू सहानी (३३) हिची तिच्या पतीने हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रवणकुमार याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
ताडाळी येथील जुना जकात नाका परिसरात मंजू ही तिचा पती श्रवणकुमार आणि आठ वर्षीय मुलासोबत राहत होती. मंगळवारपासून त्यांच्या घरातून कोणीही बाहेर पडत नव्हते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी याबाबतची माहिती घरमालकाला मिळाल्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले. त्यावेळी मंजू हिचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घर मालकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे श्रवणकुमार याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
धारावी पुनर्विकासा विरोधात ठाकरे गट मैदानात; मुलुंडमध्ये सोमवारी सभा, आंदोलनाची दिशा ठरवणार
खेरवाडीतील पोलीस अधिकाऱ्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’ची प्रवेश प्रक्रिया लवकरच
सीएसएमटी - मडगाव एक दिवसीय विशेष रेल्वेगाडी; प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास होणार मदत
मेट्रो प्रवाशांची गैरसोय; ‘कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३’च्या स्थानकांत अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा
मुंबई : मोठा गाजावाजा करीत वाहतुकीसाठी खुला झालेला कुलाबा-वांद्रे -सिप्झ मेट्रो – ३ प्रकल्प सुरुवातीपासूनच प्रवाशांसाठी डोकेदुखी बनू लागला आहे. वारंवार विविध कारणांमुळे विस्कळीत होणारी मेट्रो सेवा, पाणीगळती, तांत्रिक बिघाड आदींमुळे प्रवाशांचा खोळंबा होत असतानाच आता मेट्रो स्थानकांतील असुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
मिठी नदी गाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून १५ हून अधिक ठिकाणी छापे; ६५ कोटींच्या व्यवहारांच्या तपासणीला सुरुवात
मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत सक्त वसुली संचालनालयाने(ईडी) १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. त्यात १३ आरोपींच्या मुंबई व केरळतील कोची येथील ठिकाणांचा समावेश आहे.
अल्पवयीनांकडून खून घडवून आणणाऱ्या गुंडावर मोक्का, टोळीत सहा अल्पवयीन मुलांचा समावेश
पुणे : दहशतीसाठी, तसेच प्रतिस्पर्धी टोळीतील जुन्या वादातून अल्पवयीन मुलांकडून दोन तरुणांवर हल्ला करून एकाचा खून घडवून आणणाऱ्या आंबेगाव खुर्द परिसरातील गुंड आकाश थोरात आणि त्याच्या टोळीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियत्रंण कायदा) कारवाई करण्यात आली आहे.
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पथक; पोलीसच बसमधून प्रवास करून छेडछाडीला आळा घालणार
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या पथकातील पोलीस बसमधून प्रवास करून, छेडछाड आणि चोरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार असल्याने महिला प्रवाशांचा प्रवास आता सुकर होणार आहे.
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे