मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. तसेच, सोमवार १६ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार करोना काळात वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रकरणात हे समन्स बजावले गेले आहे.

करोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या करोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तसेच याची कॅगद्वारे चौकशी होणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
nagpur , rape victim, woman chaos
आरोपीला जामीन दिल्यामुळे बलात्कार पीडितेने न्यायालयात घातला गोंधळ
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

PHOTOS : “फक्त मातोश्रीवरून फोन येतो म्हणून संजय राऊतांच्या…” इक्बालसिंह चहलांना ‘ईडी’ समन्स आणि किरीट सोमय्याचं मोठं विधान!

दरम्यान, याप्रकरणी मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात बोलताना भाजपा नेते किरीट सोमय्यांनी तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोल्हापूरमध्ये टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले होते किरीट सोमय्या? –

“मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल, त्यांचे सरकारी आणि तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची चौकशी होऊ नये, यासाठी अनेक प्रयत्न केले. पण मी मुंबई महापालिका आयुक्तांना आव्हान दिलं होतं ही देशात लोकशाही आहे आणि याची चौकशी होणारच आहे. त्याप्रमाणे चौकशी सुरू झाली आहे. सुरुवातीला करोना काळात ज्या कंपनीला कंत्राट मिळाले होते, त्याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हळू हळू ऑक्सिजन प्लांट घोटाळा तसेच अस्लम शेख यांचे पत्र, आणि जे कोविड सेंटर कधी सुरूच नाही झालं, त्याच्या देखभालीसाठी किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या कंपनीला दिलेलं कंत्राट, यासर्वांची चौकशी होईल आणि करोना काळात जी काळी कमाई झाली आहे, त्याचा हिशोब आम्ही घेणारच”, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.