मुंबईः बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून देशाबाहेर पळालेला व्यापारी मेहूल चोक्सी याच्या २५६५ कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करून विशेष पीएमएलए न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात परवागी दिली होती. त्यानुसार सक्तवसुली संचालनालयाने १२५ कोटी रुपयांच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरूवात केली आहे. गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटरला मालमत्ता सुपूर्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल

Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
fraud of rs 15000 crores in state bank of india
स्टेट बँक ऑफ इंडियाची १५ हजार कोटींची फसवणूक; तीन वर्षांतील तपशील माहिती अधिकारातून समोर
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Enforcement Directorate ED files Enforcement Case Information Report ECIR in Torres scam case Mumbai print news
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः ईडीकडून गुन्हा दाखल, तपासाला सुरूवात; आतापर्यंत दोन हजार गुंतवणूकदांची ३७ कोटींची फसवणूक
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
Anti-Corruption Bureau arrests bribe-taking Deputy Director of Agriculture Commissionerate
पुणे : कृषी आयुक्तालयातील लाचखोर उपसंचालकाला पकडले
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक

पीएनबी व इतर बँकांची ६०९७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला व्यापारी मेहुल चोक्सीशी संबंधीत २५६५ कोटी ९० लाख रुपयांच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली होती. आरोपी मेहुल चोक्सी हा गीतांजली समुहाचा प्रवर्तक असून तो फरार आहे. मेहुल चोक्सीची मालमत्ता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील पीडितांना (बँकांना) परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, १२५ कोटी रुपयांची मालमत्ता मेसर्स गीतांजली जेम्स लिमिटेडच्या लिक्विडेटरकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील सदनिका आणि विशेष व्यापारी क्षेत्रातील दोन कारखाने, गोदाम यांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> चित्रनगरीतील कचऱ्याची जबाबदारी कोणाची ? महापालिका आणि फिल्मसिटी प्रशासनामध्ये समन्वय बैठक होणार

उर्वरित मालमत्ताही परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली. पीएनबी गैरव्यवहार हा देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा गैरव्यवहार मानला जातो. या गैरव्यवहार सीबीआयने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. मेहुल चोक्सीच्या गीतांजली ग्रुपशी संबंधीत कंपन्यासह अन्य कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा या गैरव्यवहारत समावेश आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम, कट रचणे फसवणूक ही कलमे सीबीआयने या सर्वांविरोधात लावली आहेत. त्याद्वारे ईडीनेही याप्रकरणी तपासाला सुरूवात केली होती. याप्रकरणी ईडीने देशभरात १३६ हून अधिक ठिकाणी शोधमोहिम राबवून गीतांजली ग्रुपशी संबंधित ५९७ कोटी रुपयांची मालमत्ता, वस्तू, दागिने जप्त केले. तसेच गीतांजली समूहाची १९६८ कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यात भारतातील आणि परदेशातील स्थावर मालमत्ता, आलीशान मोटरगाड्या, बँक खाती, कारखाने, शेअर्स, दागिने आणि इतरांचा समावेश आहे. एकूणच, या प्रकरणात २५६५ कोटी रुपयांची मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती.

Story img Loader