मुंबई : देशात नोव्हेंबर – डिसेंबर २०२४, या दोन महिन्यांत खाद्यतेलाच्या आयातीत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रामुख्याने सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीत वाढ तर दरवाढीमुळे पामतेलाच्या आयातीत घट झाली आहे.

द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर – डिसेंबर २०२४ मध्ये २८ लाख ५९ हजार ०६८ टन खाद्यतेलाची आयात झाली आहे. नोव्हेंबर – डिसेंबर २०२३ मध्ये २४ लाख ७२ हजार २७६ टन खाद्यतेलाची आयात झाली होती. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये खाद्यतेल आयात १६ टक्क्यांनी वाढली आहे. पामतेलाची आयात प्रामुख्याने मलेशियातून होते, पण, मलेशियाने निर्यातीवर निर्बंध लागू केल्यामुळे जागतिक बाजरात पामतेलाच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलापेक्षाही पामतेलाचे दर वाढल्यामुळे पामतेलाची आयात घटली आहे. आयातदारांनी पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेलाच्या आयातीला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, एक डिसेंबर रोजी देशात खाद्यतेलाचा एकूण साठा २५ लाख ६९ हजार टन इतका होता.

Information about impact of union budget 2025 on agriculture in marathi
विश्लेषण : कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
soybean news in marathi
नोंदणी केलेल्या पाच हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अजूनही रखडली, शासनाकडे मुदत वाढवण्याची मागणी
How much extension for soybean purchase Mumbai print news
सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा; जाणून घ्या, सोयाबीन खरेदीला किती मुदतवाढ
Economic Survey FY 2025-26 India GDP Growth Rate
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून चालू वर्षाचा आर्थिक विकास दर जाहीर; संसदेत पाहणी अहवाल सादर
Loksatta explained Why and how much did milk collection increase
विश्लेषण :राज्यात दुधाचा महापूर?
soybean procurement target for 2024 25 has adjusted based on district responses
राज्यात सोयाबीन खरेदीमध्ये सहा जिल्ह्यांच्या उद्दिष्टांना कात्री
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव

हेही वाचा >>>पीकविमा योजनेत अमूलाग्र बदल, कृषिमंत्र्यांकडून संकेत, विरोधकांची टीका

यंदा जगभरात सोयाबीनचे उत्पादन चांगले आहे. अर्जेंटिनाने मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे गाळप सुरू केल्यामुळे जागतिक खाद्यतेल बाजारावर सोयाबीन तेलाचा दबाव आहे. शिवाय जागतिक बाजारात सोयाबीन पेंडीची मुबलक प्रमाणावर उपलब्धता असल्यामुळे देशातून होणाऱ्या सोयाबीन पेंडीच्या निर्यातीत दहा टक्क्यांनी घट झाली आहे. २०२३ मध्ये ५ लाख ३२ हजार ७२९ टन पेंडीची निर्यात झाली होती. तर २०२४ मध्ये ३ लाख ९८ हजार ७३१ टन पेंडीची निर्यात झाली आहे. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये पेंडीची निर्यात दहा टक्क्यांनी घटली आहे. दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, बांगलादेश, इराण आणि तैवानला सर्वांधिक निर्यात झाली असून, पशू आणि कोंबडी खाद्यासाठी सोयाबीन पेंडीचा वापर केला जातो. 

हेही वाचा >>>स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवा – आरोग्यमंत्री

पेंडीला दर नसल्यामुळे सोयाबीनचे दर पडले

जागतिक बाजारात सोयाबीन तेल आणि सोयाबीन पेंडीचा दबाव आहे. त्यामुळे देशातून होणारी सोयाबीन पेंडीची निर्यात घटली आहे. सोयाबीन पेंडीला दर मिळत नसल्यामुळे बाजारात सोयाबीनचे दर पडले आहेत, असे मत द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. बी. व्ही. मेहता यांनी व्यक्त केले.

Story img Loader