निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न- पटोले

काँग्रेसला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, त्यामुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची बाजू भक्कम आहे

विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांचा अर्ज दाखल

मुंबई: विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या वतीने डॉ. प्रज्ञा सातव यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही   पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी २९ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. काँग्रेसने पक्षाचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने संजय केणेकर यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. काँग्रेसला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे, त्यामुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची बाजू भक्कम आहे. त्यांचा विजय निश्चित होईल, तरीही ही निवडणूक बिनिवरोध व्हावी, अशी काँग्रेसची अपेक्षा असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा महसूलमंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते व पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आदी उपस्थित होते.

भाजपला काँग्रेसचे प्रतिआव्हान

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्या या भाजपच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिले आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करून मतपत्रिकेवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान नाना पटोले यांनी दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Efforts to make maharashtra mlc election unopposed nana patole zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही