scorecardresearch

ईदसाठी मुंबईत २ लाख २१ हजार बकरे विक्रीला

बकरे चोरणाऱ्या दहा जणांना अटक

बकरे चोरणाऱ्या दहा जणांना अटक

बकरी ईदसाठी देवनार कत्तल खान्यात तब्बल २ लाख २१ हजार बकरे विक्रीसाठी आले. रविवार संध्याकाळपर्यंत त्यापैकी १ लाख ६० हजार बकऱ्यांची विक्री झाली होती.

देवनार पशुवधगृहात बकरी ईदनिमित्त भरणाऱ्या बाजारात चोरीचे प्रकार होऊ नयेत म्हणून  यावर्षी प्रथमच बार कोड असणाऱ्या प्रवेशिका व्यापाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. या यंत्रणेद्वारे दहा चोरांना पकडण्यात आले. त्यांना पोलिसांनी अटकही केली.

देवनार पशुवधगृहाच्या आवारात भोपाळ, राजस्थान, उत्तर प्रदेश, भिवंडी, रायगड येथून मोठय़ा प्रमाणात बकरे आणण्यात आले होते. रविवार संध्याकाळपर्यंत २ लाख २१ हजार बकरे, शेळ्या, मेंढय़ा तर म्हैस, रेडा अशी मोठी जनावरे विक्रीसाठी आले होते. त्यापैकी १ लाख ६० हजार जनावरांची विक्री झाली. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षण मनोरे, सीसीटीव्ही कॅमेरे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

बकऱ्याची किंमत लाखात 

या बाजारात किमान साडेतीन हजार रुपयांपासून ते ५.११ लाख रुपयांपर्यंत किमतीचे बकरे विक्रीला आले आहेत. दहिसर येथून आलेला टारझन नावाच्या बकऱ्याची किंमत ५ लाख ११ हजार रुपये आहे.  हा बकरा मलवा या जातीचा आहे. तर अफलातून नावाचा आणखी एक बकरा  ४ लाख ५० हजार रुपयांचा असल्याचा दावा त्याच्या मालकाने केला आहे. या बकऱ्याला भोपाळ येथून आणले आहे. शेरा या आणखी एका बकऱ्याची किंमत १.४० लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eid al adha bakrid 2019 mpg

ताज्या बातम्या