मुंबई: मुंबईतील घरविक्रीत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये काहीशी वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत आठ हजार ६२७ घरांची विक्री झाली असून घरविक्रीतून राज्य सरकारला ६६१ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये घरविक्रीत चढ-उतार होत होता. यादरम्यान आठ ते १२ हजारांदरम्यान घरविक्री झाली होती. केवळ  मार्चमधील घरविक्रीचा अपवाद होता. मार्चमध्ये सर्वाधिक विक्रमी अशी घरविक्री झाली होती. या महिन्यात तब्बल १६ हजारांहून अधिक घरे विकली गेली होती.

हेही वाचा >>> मुंबई: बदलेल्या राजकारणामुळे अटक; संजय राऊत यांचा उच्च न्यायालयात दावा

houses sold in Mumbai
मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Voting facility for Mumbai Thane Pune residents only in societies Pune news
मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?

आतापर्यंतची ही सर्वाधिक घरविक्री आहे. आता वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, डिसेंबरमध्ये घरविक्री स्थिर असेल का, विक्रमी घरविक्री होईल का याकडे बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जानेवारी, मे, जून, ऑगस्ट आणि ऑक्टोबरप्रमाणे नोव्हेंबरमध्येही घरविक्री १० हजाराचा पल्ला गाठू शकलेली नाही. नोव्हेंबरमध्ये मुंबईत आठ हजार ६२७ घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला ६६१ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. नोव्हेंबरमधील नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस असून रात्री उशिरापर्यंत ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.