लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे – बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) नऊ मेट्रो गाड्यांची गरज आहे. आतापर्यंत आंध्र प्रदेशातील श्रीसिटीवरून आठ गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. आता केवळ एका गाडीची प्रतीक्षा असून ही गाडीही येत्या काही दिवसात आरे कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

A survey on the use of Metro 3 by a consultancy firm in transport services Mumbai
मेट्रो ३ वापरण्यासाठी ६० टक्के मुंबईकर उत्सुक; अर्थ ग्लोबलचा अहवाल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Trans Harbor route affected due to technical fault near Nerul railway station
नेरुळ येथे तांत्रिक बिघाड, ट्रान्स हार्बरची रेल्वे वाहतुक विस्कळीत, ठाणे, ऐरोली, रबाळे सह महत्त्वाच्या स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली
Margaon to Panvel special trains for return journey to Konkankars Mumbai news
मडगाव-पनवेल विशेष रेल्वेगाड्या, परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांना दिलासा
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
AC local trains, central railway, railway passengers
मध्य रेल्वे मार्गावर आज ‘वातानुकूलित’ऐवजी ‘विनावातानुकूलित’ लोकल, प्रवाशांच्या गोंधळात भर
Implementation of the ban on POP idols in Mumbai in a phased
मुंबईत पीओपी मूर्तीवरील बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने
During the work on the Andheri to Mumbai International Airport Metro 7A route a pothole fell Mumbai
सहार येथे आठ मीटर खोल खड्डा ; ‘मेट्रो’ भुयारीकरण कामात विध्न

एमएमआरसीच्या माध्यमातून मेट्रो ३ चे काम सुरु आहे. ३३.५ किमीची ही मार्गिका दोन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यानुसार बीकेसी ते आरे असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये तर बीकेसी ते कफ परेड असा दुसरा टप्पा जून २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरसीचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरसीने पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला तसेच तांत्रिक कामाला वेग दिला आहे. तर दुसरीकडे मेट्रो गाड्या मुंबईत आणून त्यांची चाचणी घेण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. ३३.५ किमीच्या या मार्गिकेसाठी ३१ गाड्यांची आवश्यकता आहे. या गाड्यांची बांधणी आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे एका खासगी कंपनीच्या माध्यमातुन केली जात आहे.

आणखी वाचा-नारळ विक्रेत्यांना गणेशोत्सव लाभदायी! पुणे-मुंबईत दररोज ७० ते ८० लाखांहून विक्री 

दरम्यान आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी एमएमआरसीला नऊ मेट्रो गाड्यांची आवश्यकता आहे. त्यानुसार आतापर्यंत बांधणी पूर्ण झालेल्या देशी बनावटीच्या, स्वयंचलित आठ गाड्या मुंबईत दाखल झाल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली. पहिली गाडी ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबईत दाखल झाली होती. तर आता सप्टेंबर २०२३ मध्ये आठवी गाडी मुंबईत आली आहे. आता एका गाडीची प्रतीक्षा असून ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. त्याचवेळी या नव्या मेट्रो गाड्यांमधून तसेच भुयारी मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षाही येत्या तीन ते चार महिन्यात संपण्याची शक्यता आहे.