scorecardresearch

Premium

‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर सोमवारपासून आठ अधिक फेऱ्या, प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे ‘एमएमएमओसीएल’चा निर्णय

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

metro 6 kanjur carshed
(फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवार, २४ एप्रिलपासून या दोन्ही मार्गिकांवरील गाडय़ांच्या आठ फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे ‘एमएमएमओसीएल’ने जाहीर केले आहे.

 ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्या लागल्या असून या मार्गिकांवरील प्रवासी संख्या वाढू लागली आहे. प्रवाशांच्या संख्येने नुकताच दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. ही संख्या लक्षात घेता एमएमएमओसीएलने फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सोमवारपासून या दोन्ही मार्गिकांवर आठ फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दिवसाला एकूण २४५ ऐवजी २५३ फेऱ्या होणार आहेत. वाढीव फेऱ्यामुळे  गाडय़ांची वारंवारता गर्दीच्या वेळी ७ मिनिटे ५० सेकंदाऐवजी  ७ मिनिटे २८ सेकंद अशी असणार आहे. गर्दी नसताना वारंवारता १० मिनिटे २५ सेकंद अशी असणार आहे.

local passengers, panvel mumbai local, local passengers suffer due to low speed
पनवेल मुंबई लोकलची गती मंदावली, हार्बर-ट्रान्सहार्बर रेल्वे प्रवाशांचे हाल
mumbai metro 1 ghatkopar to varsova
मेट्रो १ मार्गिकेवर दैनंदिन प्रवासी संख्येचा विक्रम; २७ सप्टेंबरला तब्बल इतक्या लाख प्रवाशांनी केला प्रवास
nmmt special bus service get low response
नवी मुंबई : एनएमएमटीच्या विशेष बस सेवेला प्रवाशांचा अल्पप्रतिसाद; केवळ ५०% प्रवासी, उत्पन्न ही कमीच
ticket price waterway Karanja Rewas increased Rs.10
करंजा रेवस जलमार्गावर १० रुपयांनी तिकीट दरवाढ; सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजी

 गर्दीच्या वेळी शनिवारी वारंवारता ८ मिनिटे १५ सेकंद तर, गर्दी नसताना १० मिनिटे २५ सेकंद अशी असेल. या दोन्ही मार्गिकांवर शनिवारी मेट्रोच्या केवळ २३८ फेऱ्या होतील. रविवार आणि महत्त्वाच्या सरकारी सुट्टीच्या दिवशी मेट्रोच्या २०५ फेऱ्या होतील. या दिवशी गाडय़ांची वारंवारता १० मिनिटे ३० सेकंद अशी असणार आहे. दरम्यान, या दोन्ही मार्गिकांसाठी ३० मेट्रो गाडय़ा सेवेत असून यातील २७ गाडय़ा कार्यान्वित आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eight more trips on metro 2a metro 7 routes from monday ysh

First published on: 22-04-2023 at 00:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×