महानंदच्या निवडणूक रिंगणात खडसे यांच्या पत्नी

या संघाच्या २१ जागांसाठी ३० मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी उतरल्या असून आज त्यांनी महिला प्रतिनिधी वर्गातून आपला अर्ज दाखल केला. या संघाच्या २१ जागांसाठी ३० मार्च रोजी निवडणूक होणार आहे. कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या संघावर कब्जा करण्यासाठी भाजपने गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी केली आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी उत्तर महाराष्ट्र महिलागटातून अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे शैलजा प्रकाशबापू पाटील, ज्ञानेश्वर पवार, अजय धायगुडेपाटील यांनीही  उमेदवारी अर्ज दाखल केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Eknath khadse in mahanada election

ताज्या बातम्या