scorecardresearch

एकनाथ खडसे यांचा आज जबाब

बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण(फोन टॅपिंग) प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचा जबाब कुलाबा पोलीस नोंदवणार आहेत.

मुंबई : बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण(फोन टॅपिंग) प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचा जबाब कुलाबा पोलीस नोंदवणार आहेत. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार म्हणून खडसे यांचा जबाब गुरुवारी नोंदवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी एकनाथ खडसे व शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याचा आरोप आहे. त्यामुळे खडसेंचा जबाब नोंदण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी खडसे कुलाबा पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी याप्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जबाब दोन वेळा नोंदवण्यात आला होता. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असलेल्या शुक्ला या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अप्पर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्त आहेत. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याचा आरोप आहे. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath khadse phone tapping colaba police report ysh

ताज्या बातम्या