मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईतील गटार सफाईचा मुद्दा उपस्थित केला. तसेच गुदमरून होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवरही त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. “पालिकांनी मॅनहोल सफाईसाठी रोबोटचा वापर करावा. त्यासाठी सरकार आणि पालिका निधी देईल. मात्र, गटारात गुदमरून एकही मृत्यू होता कामा नये,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. ते शुक्रवारी (३० सप्टेंबर) मुंबई येथे आयोजित ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.०’ शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मॅनहोलसाठी रोबोटचं मी उद्घाटन केलं होतं. मॅनहोलमध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू होतो. रोबोटमुळे आपण हे टाळू शकतो. सगळ्या नगरपालिकांना त्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. हे मशीन आपण देण्याची आवश्यकता आहे. गुदमरून एकही मृत्यू होता कामा नये. ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे.”

PM Modi to address rallies in Maharashtra
मैदान निसटू न देण्यासाठी मोदींच्या सभांवर सभा!
discussion about constitution change is an insult to babasaheb says ramdas athawale
संविधान बदलाची चर्चा हा बाबासाहेबांचा अपमान; रामदास आठवले यांचा आरोप, दलित मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा 
Shiv Sena UBT to Election Commission on election theme song
‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’बाबत फेरविचार करा; ठाकरे गटाची  निवडणूक आयोगास विनंती
no road toll for mulund society residents bjp candidate mihir kotecha claim
मुलुंडच्या हरिओम नगरमधील रहिवाशांना टोलमाफी? भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा दावा

“लोकं रस्त्यावरील डांबर हाताने काढून दाखवतात”

एकनाथ शिंदेंनी रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ठेकेदारांना फैलावर घेतले. ते म्हणाले, “काही ठिकाणी व्हिडीओ येतात. त्यात लोकं रस्त्यावरील डांबर हाताने काढून दाखवतात. असं काम आपण कसं सहन करू शकतो. त्यामुळे सरकारचे जे पैसे जातात त्याचा योग्य वापर झाला पाहिजे.”

आपण ठेकेदारासाठी हे काम काढलं असं लोकांनी म्हणता कामा नये”

“आपण ठेकेदारासाठी हे काम काढलं असं लोकांनी म्हणता कामा नये. जे काम आपण करू ते टिकलं पाहिजे. ही जबाबदारी आपल्या अधिकाऱ्यांची आहे. पैसे देण्याचं काम सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे, पण चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

“मुंबई महानगरपालिकेला पैशांची अडचण आहे का?”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मुंबई महापालिका एवढी मोठी आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तरी मुंबईत एवढे खड्डे आहेत. याबाबतीत काय निर्णय घेता येईल असं मी बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांना विचारलं. ते म्हणाले आपण दरवर्षी थोडे थोडे काँक्रेटचे रस्ते घेतो. मी म्हटलं, थोडे थोडे का घेतो? पैशांची काही अडचण आहे का? ते म्हटले नाही.”

“यावर्षी ४५० किलोमीटर काँक्रेट रस्त्यांच्या कामाचे आदेश”

“यानंतर मी त्यांना यावर्षी ४५० किलोमीटरचे काँक्रेटचे रस्त्यांचं काम करण्यास सांगितलं आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी या कामाच्या टेंडरचं काम सुरू केलं. आता मुंबई महानगरपालिकेने ५,५०० कोटी रुपयांचे काँक्रेट रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती शिंदेंनी दिली.

“मार्चमध्ये मुंबईतील उरलेले सर्व रस्ते काँक्रेटचे होतील”

काँक्रेट रस्त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुंबईसाठी आपल्याला काम केलं पाहिजे, मुंबईचा चेहरामोहरा बदलला पाहिजे असं म्हटलं. शांघाय बिंगाय जाऊ द्या, पण आपण स्वच्छ आणि सुंदर मुंबई करू शकू. त्याची सुरुवात झाली आहे. येत्या मार्चमध्ये मुंबईतील उरलेले सर्व रस्ते काँक्रेटचे होतील यासाठी काम सुरू आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबईत एकही खड्डा बघायला मिळणार नाही.”

हेही वाचा : “माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको, कारण…”, शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान

“असं कुठंही खपवून घेतलं जाणार नाही”

“प्रकल्प मंजूर होतात, पण ते पूर्ण होत नाहीत. एखादा ठेकेदार एकदम बिनकामाचा निघतो. त्यामध्येही काही गोष्टी अव्यवहार्य झालेल्या असतात. त्याचा फटका शहरांना बसतो. असं कुठंही खपवून घेतलं जाणार नाही. जे रस्ते बांधतो किंवा दुरुस्त करतो ते काम गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे. ती शेवटी आपली जबाबदारी आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.