मुंबई; लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ नामंजूर होणे हे दुर्दैवी आहे. शिवसेना शिंदे पक्ष काँग्रेस इंडिया आघाडीचा निषेध करीत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावर जाहीर केले.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीने गरिब, आदिवासी, मागास, अनुसूचित जाती-जमातीतील माता-भगिनींना संसदेत येऊ न देण्यासाठी महिला-विरोधी भूमिका घेतली. शिवसेना याचा तीव्र शब्दांत निषेध करते.
देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी एक ऐतिहासिक प्रयत्न केला होता. परंतु, विरोधकांचा महिलांप्रती असलेला आकस आज दिसून आला. त्यांचा खरा आणि दुष्ट चेहरा आज समोर आला. हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस ठरेल. आता येणाऱ्या काळात देशातील आमच्या लाडक्या बहिणींचे रुद्र रूप विरोधकांना पाहायला मिळेल असे शिंदे यांनी म्हटले आहे.
