मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेता आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल साडेतीन वाजता हेलिकॉप्टर महालक्ष्मी रेसकोर्स वरील हेलिपॅड वरून मुरबाड कडे जाण्यास टेक ऑफ घेतला. दहा ते पंधरा मिनिटात हे हेलिकॉप्टर ऐरोली येथे पोहचलेले असताना ठाणे जिल्ह्यात सुरू असलेले वादळ पायलटला हेलिकॉप्टर च्या दिशेन येताना दिसले. हेलिकॉप्टर पायलटच्या लक्षात आले. काहीतरी गडबड आहे. ह्या वादळापुढे हेलिकॉप्टर टिकाव धरू शकत नाही. एका बाजूला धुरळा आणि वादळ आणि दुसऱ्या बाजूला ऐरोलीतील टोलेजंग इमारती अशा स्थितीत हेलिकॉप्टर पुढे घेऊन जाणे म्हणजे सर्वांचा जीव धोक्यात घालण्यासारखे होते. हेलिकॉप्टर पायलटने हेलिकॉप्टर मागे वळविण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांना सांगितला.

कोणत्याही संकटाला न घाबरणाऱ्या शिंदे यांनी हेलिकॉप्टर ठाण्याला उतरविण्याचे पायलटला सुचविले मात्र ते योग्य ठरणार नाही असे पायलटने शिंदे यांना समजावून सांगितले. हे सर्व एक दोन मिनिटात झाले. तीन महिन्यापूर्वी अजित पवार यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला असल्याने अलीकडे सर्वच जण हेलिकॉप्टर प्रवासाला नको म्हणतात पण शिंदे यांनी आपले सहकाऱ्यांना धीर दिला आणि हेलिकॉप्टर माघारी वळविण्याचा सल्ला दिला. अशा बाका प्रसंगात शिंदे यांनी सहकाऱ्यांना धीर दिल्याने काही क्षण निशब्द झालेले सहकारी खाली उतरल्यावर हास्य विनोदात मश्गूल झाले.

शिंदे दुपारी एका पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नाला मुरबाड मध्ये जात होते. तिथे जाता न आल्याची खंत शिंदे यांच्या मनाला लागली.