चहल आणि जलोटा केंद्रात सचिवपदासाठी पात्र

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा हे दोन राज्याच्या सेवेतील सनदी अधिकारी केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी पात्र ठरले आहेत.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा हे दोन राज्याच्या सेवेतील सनदी अधिकारी केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी पात्र ठरले आहेत. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने सचिवपदासाठी पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात १९८८ च्या तुकडीतील राजीव जलोटा आणि १९८९ च्या तुकडीतील चहल या राज्याच्या सेवेतील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जलोटा हे थेट सचिवपदासाठी तर चहल हे सचिव समकक्ष पदासाठी पात्र ठरले आहेत. सचिव समकक्ष पदासाठी पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्याची केंद्रातील महत्त्वाच्या सचिवपदावर नियुक्ती केली जात नाही. राज्याच्या सेवेतील अरविंद सिंह, अपूर्व चंद्र आणि राजेश अगरवाल हे तीन सनदी अधिकारी केंद्र सरकारमध्ये सध्या सचिवपदावर कार्यरत आहेत.

चहल यांनी करोनाकाळात केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली होती. केंद्र सरकारमध्ये सचिवपदासाठी पात्र ठरल्याबद्दल चहल यांनी ट्वीट करून सनदी सेवेत एक महत्त्वाची पायरी पार केल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eligible post of secretary at chahal and jalota center corporation commissioner ysh

Next Story
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन; जानेवारी ते एप्रिलदरम्यान किवळी ते खंडाळा हद्दीत ४८ हजार ७६३ जणांविरोधात कारवाई
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी