आपत्कालीन साखळीची डोकेदुखी

मध्य रेल्वेवर जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये सहप्रवासी फलाटावर राहिल्याने साखळी खेचल्याच्या १३२ घटना घडल्या आहेत.

रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम; विनाकारण साखळी खेचण्याच्या अडीच हजार घटना

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना गाडी थांबविता यावी यासाठी लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये असलेली आपत्कालीन साखळी मध्य व पश्चिाम रेल्वेसाठी डोके दुखी ठरत आहे. गेल्या साधारण दोन वर्षांत किरकोळ कारणांसाठी साखळी खेचण्याच्या २,५२५ घटना घडल्या असून त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

लोकल किंवा एक्स्प्रेस पकडताना एखादा मित्र किंवा नातेवाईकाला काही कारणास्तव डब्यात प्रवेश न मिळणे, फलाटावर सामान विसरणे, चुकीची गाडी पकडल्याने पुन्हा दुसऱ्या स्थानकात उतरण्यासाठी प्रयत्न करणे, ठरावीक स्थानकात उतरण्यासाठी प्रयत्न करणे अशा किरकोळ कारणांसाठी आपत्कालीन साखळी खेचल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडत असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात जानेवारी ते डिसेंबर २०२० आणि जानेवारी ते

ऑगस्ट २०२१ या कालावधीत आपत्कालीन साखळी खेचण्याच्या एकूण १,५५९ घटना घडल्या  आहेत.

पश्चिम रेल्वेच्याही मुंबई विभागात गेल्या वर्षापासून एकू ण ९६६ प्रकरणे रेल्वे सुरक्षा दलाकडे दाखल झाली असून यामध्ये ९३५ प्रकरणे मेल-एक्स्प्रेसमधील असून ऊर्वरित लोकल गाड्यांमधील आहेत. विनाकारण साखळी  खेचणाऱ्या प्रवाशांकडून एकूण  ४ लाख ७४ हजार रुपये दंड  वसूल केल्याचे पश्चिम रेल्वे  सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय  सुरक्षा आयुक्त विनीत खरप यांनी सांगितले.  

साखळी ओढण्याची कारणे

  मध्य रेल्वेवर जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये सहप्रवासी फलाटावर राहिल्याने साखळी खेचल्याच्या १३२ घटना घडल्या आहेत. दुसऱ्याच एखाद्या फलाटावर लोकल किं वा मेल-एक्स्प्रेसच्या गाडीची वाट पाहिल्याने आणि त्यामुळे धावत जाऊन अन्य प्रवाशांना डब्यात प्रवेश देण्यासाठी डब्यातील आपत्कालीन साखळी खेचण्याच्या ७२ घटना घडल्या आहेत चुकून अन्य गाडीत किंवा डब्यात प्रवेश केल्याने उतरण्यासाठी साखळी खेचल्याच्या

७८ घटनांची नोंद झाली आहे. याशिवाय गर्दीमुळे गाडीत प्रवेश करता न येणे, सामान गाडीत चढवता न येणे, अन्य प्रवाशाशी झालेला वाद, अस्वच्छता, अनधिकृत फेरीवाले गाडीत चढल्याने यासह अन्य कारणांमुळे आपत्कालीन साखळी खेचण्यात आली आहे.

वेळापत्रक बिघडत असल्याने गाड्या विलबांने

साखळी खेचल्याने लोकल किं वा मेल-एक्स्प्रेस गाडी त्या ठिकाणी उभीच राहते. ज्या डब्यातून साखळी खेचली आहे, तेथे गार्ड किं वा पोलीस तसेच स्टेशन मास्तर जाऊन पाहणी करतात. त्यानंतर असलेली समस्या सोडवून गाडी पुढे जाण्यासाठी हिरवा कं दील देतात. परंतु यामुळे त्या रेल्वेगाडीचा आणि त्यामागोमाग असलेल्या अन्य गाड्यांच्या वेळांवर परिणाम होतो. यामुळे गाड्या विलंबाने धावतात.

कल्याण स्थानकात सर्वाधिक घटना

२०२१ मध्ये कल्याण स्थानकात आपत्कालीन साखळी खेचण्याच्या सर्वाधिक ११७ घटना घडल्या आहेत, त्यापाठोपाठ लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे व सीएसएमटी स्थानकात नंतर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरिवली यांसह अन्य काही स्थानकांतही या घटनांची नोंद आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Emergency chain headaches impact on railway schedule akp

ताज्या बातम्या