लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय व दंत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, मागण्या व अडचणींबाबत अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे व सबंधित अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत नसल्यामुळे रुग्णालयात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मागण्यांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संवर्गातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली १ जून रोजी सकाळच्या पाळीपासून नैमित्तिक रजा घेऊन उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयातील व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
Sameer Wankhede, Narcotics case,
अमली पदार्थ प्रकरण : समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा, उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन

आस्थापनेवरील चतुर्थश्रेणी कामगारांच्या १३९ पदांपैकी सुमारे ५१ पदे रिक्त आहेत. जवळपास ४० टक्के पदे रिक्त असतानाही रुग्णसेवेसाठी असलेल्या चतुर्थश्रेणी कामगारांना अधिष्ठाता कार्यालय, आस्थापना विभाग व पदाव्यतिरिक्त अन्य कामे दिली जात आहेत. अशा कामगारांना त्यांच्या पदानुरुप काम देण्याचे आदेश अधिष्ठात्यांनी दिले आहेत. सफाई कामगारांची सर्व २६ पदे भरलेली असताना वसतिगृहाचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराला मदत करण्यासाठी प्रशासन सफाई कामगारांना अन्य कामे देत आहे. १२ कंत्राटी कामगारांना चतुर्थश्रेणी कामगारांच्या रिक्त पदांवर घेतले आहे. मात्र त्यांना त्यांच्या पदाचे काम न देता अन्य काम दिले आहे, असा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा… मुंबईः चोर असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू; मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक

डॉक्टर्स, परिचारिका व अन्य महिला कर्मचाऱ्यांची संयुक्त खोली व स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी स्वतंत्र महिला सफाई कामगार देणे आवश्यक आहे. मात्र पुरुष सफाई कामगारांकडून ही कामे करून घेण्यात येत आहेत. लाड पागे समितीच्या धोरणाप्रमाणे सफाई कामगारांना शैक्षणिक अर्हता, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र यामधून सूट देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात सफाई कामगारांकडे जात प्रमाणपत्रांची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे), सहआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

हेही वाचा… मुंबई: ऑरेंज गेट- मरिन ड्राईव्ह भुयारी मार्ग :बांधकामाच्या निविदेला पुन्हा मुदतवाढ

म्युनिसिपल मजदूर युनियन नायर रुग्णालय व दंत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मागण्या व अडचणींबाबत अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे व सबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. परंतु प्रशासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास तयार नाही. कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २४ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत जेवणाच्या वेळेत दुपारी १२.३० ते दुपारी १ वाजता मागणी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यावेळी मागण्यांबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास येत नसल्याने १ जून २०२३ रोजी सकाळच्या पाळीपासून कर्मचारी नैमित्तिक रजा घेऊन अधिष्ठाता कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.