लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः नीरव मोदीने केलेल्या बँक गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) स्थावर मालमत्ता व बँक ठेवी अशा २९ कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. ६४९८ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे बुधवारी ईडीकडून सांगण्यात आले.ईडीने नीरव मोदी व त्याच्याशी संबंधीत समूहाच्या जमीन, इमारती व बँक ठेवी अशा एकूण २९ कोटी ७५ लाख रुपयांची माहिती घेतली होती. त्यांच्यावर आता ईडीने टाच आणली आहे. याप्रकरणात आतापर्यंत स्थावर आणि जंगम अशा एकूण २५९६ कोटींच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे.

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असून तो या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. केंद्रीय अन्वेषण विभागही (सीबीआय) या प्रकरणी चौकशी करत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांच्या पीएनबी बँकेच्या फसवणूक प्रकरणात पीएमएलए कायद्या अंतर्गत ईडीने गुन्हा दाखल होता. नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांना फरार घोषित केल्यानंतर आर्थिक गुन्हेगार म्हणून त्याच्या जंगम आणि स्थावर अशा एकूण ६९२ कोटी ९० लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती. तसेच १०५२ कोटी ४२ लाख रूपयांची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकेला परत करण्यात आली आहे.

High Court warns State Governments Urban Development Department over implementation of fire safety rules
अन्यथा सर्व बांधकामांच्या परवानग्या रोखू, अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवरून न्यायालयाचा इशारा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
rbi urban cooperative banks
नागरी सहकारी बँकांना भांडवल उभारणीचे नवीन मार्ग, रिझर्व्ह बँकेकडून चर्चात्मक दस्ताचा प्रस्ताव
Reasons behind the failure of Modi government multi crore oilseeds scheme Pune news
मोदी सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या तेलबियांच्या योजना फसल्या; जाणकारांनी सांगितली अपयशाची कारणे…
NCP Sharad Pawar group leader Jitendra Awad allegation regarding the project contractor thane
प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरतो मग, कंत्राट काढले जाते; राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
karnataka cm siddaramaiah
‘मुदा’ घोटाळाप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; तक्रारदाराचा आरोप, ईडीकडे कारवाईची मागणी
case file against Four drug company owners in counterfeit drug case
बनावट औषध प्रकरण : चारही औषध कंपन्यांच्या मालकावर गुन्हे
238 Crore works by Mahavitran for empowerment of power distribution system in Nagpur
ऊर्जामंत्री फडणवीसांच्या नागपुरात वीज यंत्रणा टाकणार कात!; ३१३ कोटींच्या निधीतून…

हेही वाचा >>>अखेर धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन रद्द; स्थानिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर डीआरपीपीएलची माघार

नीरव मोदीने वर्षाच्या सुरूवातीला ब्रिटन येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होेता. तो तेथील न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर नीवर मोदीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या तो ब्रिटनमधील तुरुंगात आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.